Pune Bangladeshi :  पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मावळमध्ये एका बांगलादेशी घुसखोरानं घर बांधून संसार थाटल्याचं उघडकीस आले आहे.  पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक एका प्रकरणाची चौैकशी करत असताना या बांगलादेशी घुसखोराचे नाव समोर आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजक्ट; पुणे नाशिक प्रवास फक्त 120 मिनिटांत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील मावळमध्ये या बांगलादेशी घुसखोरानं घर बांधून संसार थाटल्याचं उघडकीस आले आहे. मुजम्मिल खान असं या आरोपीचं नाव आहे. या रोहिंग्यानं  2013 मध्ये भारतात सहकुटुंब अवैधरीत्या घुसखोरी केली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने चौघांवर कारवाई केली होती. त्यांच्या चौकशीतून मुजल्लीम खान याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.


मुजम्मिल खान 2012 मध्ये  म्यानमारमधून  बांगलादेशात स्थलांतर केलं त्यानंतर. यानंतर या रोहिंग्यानं   2013मध्ये त्यानं भारतातील कोलकात्यात सहकुटुंब घुसखोरी केली. कोलकात्यामधून तो कुटुंबासह  पुण्यात वास्तव्याला आला. पुण्यात तो कपड्याचा, सुपारीचा व्यवसाय करत होता. धक्कादायक म्हणजे मुजम्मिल खान यानं केवळ 500 रुपयात भिवंडीतून आधारकार्ड तयार केल्याचंही तपासातून उघड झालंय. सुपारी विक्रीचे काम करताना त्यानं मावळमधील देहूरोडमध्ये 80 हजार रुपये रोख देऊन त्यानं जागा खरेदी केली. याच जागेवर स्वताचं घर बांधलं.  तसंच भारतीय पासपोर्टही मिळवलं.


जुलै महिन्यात 4 रोहिंग्या हे म्यानमार मधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून थेट मावळ मधील देहूरोड परिसरातील गांधीनगर भागात पंडित चाळीत बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी या चौघांवर कारवाई केली होती. त्यांच्या चौकशीतून  मुजल्लीम खान याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मुजम्मिल खान म्यानमारच्या इस्लामिक संस्थेत मौलानाचा कोर्स करत असल्याचेही समोर आले आहे. 


रोहिग्यांच्या अवैध वास्तवाची माहिती दहशतवाद पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत चौघांना ताब्यात घेतलं. मात्र बांगलादेशी रोहिग्या भारतात येतो आणि पुण्यात घरही खरेदी करतो आणि त्याची माहिती कोणत्याही यंत्रणेला नसनं ही सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.