Pune Crime News : पुणे तिथे काय उणे ही म्हण जग प्रसिद्ध आहे. पुणे शहराला शिक्षणाची पंढरी म्हणलं जात परंतु सद्या पुण्याचा क्राईम पण सर्वधिक झाला आहे. मात्र, पुण्यात होणाऱ्या चोऱ्या ही अनोख्या व्यहाला लागल्या आहेत. सोन पैसे दरोडा च्या पलीकडे एका चोरणे जॉकीच्या शोरूम मधू पुरुष आणि स्त्रीचे अंतर्वस्त्र चोरी केली आहेत. याला आता येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
गणपत मांगीलाल डांगी वय ४४ वर्षे (रा विठ्ठल नगर सिंहगड रोड पुणे) असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मुद्दे माल जप्त करण्याबाबत माहिती पोलीस घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९/०४/२०२५ रोजी तपास पथकाचे श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे, व पोलोस हवालदार सागर जगदाळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त झाली की कल्याणीनगर येथील एस एल एन्टरप्रायजेस नावाचे जॉकी कंपनीचे कपडयाचे शॉपमध्ये चोरी करणारा इसम नामे गणपत डांगी हा कल्याणीनगर येथे थांबलेला आहे.
पुणे शहरामध्ये चोरीच्या गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त साो., मा. पोलीस सह-आयुक्त, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सुचना दिलेल्या होत्या. आरोपीला अटक केल्यानंतर कसून चौकशी केल्यावर त्याने आपला गुन्हा काबुल केला जॉकी च्या शोरूम मधून त्याने तब्बल ८ लाखाच्या किमतीचे अंतवस्त्र चोरी केले आहेत, त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे