पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाबद्दल वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा; 6 पानी रिपोर्टमध्ये डॉ. घैसास यांनी...

Pune Deenanath Mangeshkar Hospital Controversy : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

नेहा चौधरी | Updated: Apr 17, 2025, 08:19 PM IST
पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाबद्दल वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा; 6 पानी रिपोर्टमध्ये डॉ. घैसास यांनी...

Pune Deenanath Mangeshkar Hospital Controversy पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल समोर आला आहे. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना अहवालात क्लीन चिट मिळाली आहे. तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरही ठपका ठेवण्यात आलेले नाही. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केलाय. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट दिली आहे. तर पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससून रुग्णालयाकडून अभिप्राय मागितला आहे.

पुण्यातील प्रकरणात मेडिकल असोसिएशनने डॉ. घैसास यांना क्लिन चिट दिली आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणं चुकीचं आहे. संबंधित गर्भवती महिलेला आतापर्यंत योग्य ट्रीटमेंट दिली होती. शिवाय ट्रीटमेंट देत असताना काही सूचना वेळोवेळी केल्या होत्या. अॅडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला. त्यामुळे घैसास यांची कुठे या प्रकरणात चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य पद्धतीने केलं असं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलंय. 

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पुणे पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी ही मागणी मान्य केली आहे. पुणे पोलिसांनी एक कर्मचारी डॉक्टर घैसास यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केला आहे.

गेल्या महिन्यात, 28  मार्चला दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापनानं भिसे कुटुंबाकडून 10 लाखांची मागणी केली. त्याशिवाय उपचार करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या तनिषा यांचा 31 मार्चला दोन मुलींना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. जन्माला आलेली ती दोन मुलं आईला पोरकी झाली आणि आता भिसे कुटुंबही या सगळ्या प्रकरणात होरपळतंय.