Pune Land Deal : (Municipal Corporation Election 2026) मनपा निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्षांनी झोकून देत काम करण्यात सुरुवात केली. एकत्र असणाऱ्या पक्षांची युती तुटली, तर कुठं कल्पनाही नसेल अशी युती झाली. राज्यात एकिकडे फक्त आणि फक्त राजकीय घडामोडींचीच चर्चा असताना पुन्हा एकदा एका मोठ्या प्रकणानं सामान्यांचं लक्ष वेधलं आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे यामध्ये असणारं एक मोठं नाव.
पुण्यातील मुंढवा इथं जमीन गैरव्यवहार प्रकरणी जेडिआर संतोष हिंगणे यांचाही जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला असून, आता तपास यंत्रणांकडून शीतल तेजवानीच्या वकिल तृप्ता ठाकूर यांनी जाहिर केलेल्या what's up चॅटचीही चौकशी करत आहेत. या मध्ये येत्या काळात (Ajit Pawar) अजित पवार यांच्या टिममधील प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती असून, EOWचे तपास अधिकारी दत्ता वाघमारे हे मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा तपास करत आहेत.
दरम्यान याप्रकरणी तेजवानीच्या वकील तृप्ता ठाकूर यांनी बावधन पोलिसांना दिलेल्या जबाबात अमेडिया कंपनीनेच आपल्याकडून हा दस्त नोंदवून घेतल्याचा आरोप केला होता. ज्यामुळं आतातरी पुणे पोलिसांकडून पार्थ पवारांची चौकशी केली जाणार का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच या प्रकरणी सुरू असणाऱ्य़ा तपासातून नवी माहिती समोर आल्यानं आता ही कारवाई वेग घेते की त्यास नवं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी सध्या पोलीस कोठडीत असून ती या प्रकरणात मुख्य सूत्रधार गणली जात आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीवरुन शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आसी. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासाने 5 नोव्हेंबर 2025 ला उघड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव असणारी कागदपत्रही झी 24 तासाने समोर आणल्यानं त्यातील इतरही अनेक धागेदोरे आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.