पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार?

Sangram Thopate Bhor : पुण्यातील भोर मतदारसंघावर संग्राम थोपटे यांची मजबूत पकड असून त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील सहा वेळा आमदार होते. 

नेहा चौधरी | Updated: Apr 18, 2025, 12:48 AM IST
पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार?

निलेश खरमरे झी 24 तास पुणे :  काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. येत्या 22 तारखेला भाजप पक्षात मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. दरम्यान यात संग्राम थोपटे यांच्या नावाची देखील चर्चा सुरुय.

काँग्रसचे नेते संग्राम
थोपटे भाजपमध्ये
प्रवेश करणार?

थोपटे काँग्रेसचा हात
सोडून कमळ हाती
घेणार?

पुण्यात काँग्रेसला
पुन्हा मोठा धक्का
बसणार?

पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. येत्या 22 तारखेला संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे..

संग्राम थोपटेंचा राजकीय प्रवास?

सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे पूत्र

संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला

2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले

2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले

त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली

विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटेंना 2024मध्ये पराभव स्वीकाराव लागला.

भोर विधानसभा निकाल

2024च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी आव्हान दिलं
होतं. या निवडणुकीत शंकर मांडेकरांना 1 लाख 26 हजार 455 मतं मिळाली होती. तर संग्राम थोपटेंना 1 लाख 6 हजार
817 मतं मिळाली होती. जवळपास 19 हजार 638 मतांनी संग्राम थोपटेंचा पराभव झाला होता.

संग्राम थोपटेंनी विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केली. दोनवेळा मंत्रिपद हुकल्याचीही खंत त्यांच्या मनात होती. तोच राग मनात धरुण त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन देखील फोडलं होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला. आणि आता संग्राम थोपटेंनीही काँग्रेस सोडल्यास पुण्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसणार.