पुण्यात कचरा कोंडी अशी थोडक्यात टळली
नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ पुन्हा एकदा आजपासून कचरा कोंडीच्या तयारीत होते.
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कचरा कोंडी झाली असती पण ती थोडक्यात टळली. मागच्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ पुन्हा एकदा आजपासून कचरा कोंडीच्या तयारीत होते.
पण आयुक्तांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित झालं. 3 महिन्यात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. महापालिकेकडून आयुक्त कुणाल कुमार यांनी गावक-यांना लेखी आश्वासन दिलं आणि वाद वेळीच मिटला.