Pune Koregaon Park Land Deal: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून केलेल्या एका जमीन व्यवहाराचा भांडाफोड 'झी 24 तास'ने केला आहे. गैर मार्गाने हा व्यवहार करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकारबरोबरच प्रशासनाला जाग आली असून निलंबनाच्या कारवाईपासून ते पुन्हा या प्रकरणाच्या फाईल तपासून पाहण्यापर्यंत अनेक निर्णय मागील दोन दिवसांमध्ये झाले आहेत. विरोधी पक्षांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असं असतानाच काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही अजित पवारांविरोधात मोहीम सुरु केली आहे. अजित पवारांवर निशाणा साधताना वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून खोचकपणे महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका केली जात आहे. काँग्रेसने तयार केलेली काही कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या एका व्हायरल व्हिडीओचा संदर्भ देत पोस्ट केलेलं कार्ड चांगलेच चर्चेत आहे.
अजित पवार यांची चुलत बहीण आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणामध्ये अप्रत्यक्षपणे आपल्या भाच्याची म्हणजेच पार्थ पवार यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं. यामध्ये त्यांनी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. मात्र असं असलं तरी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असतानाच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची नक्कल करत केलेल्या टीकेचा संदर्भ घेत आता त्याच वाक्यांचा आधार घेत काँग्रेसने पार्थ पवार प्रकरणावरुन टोला लागवला आहे. निवडणुकीच्या काळात 15 वर्षांमध्ये ज्यांचा फोन आला नाही ते सुद्धा तुम्हाला फोन करतील असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची नक्कल एका जाहीर कार्यक्रमात केली होती. 'अरे कसा आहेस तू...मला येऊन भेट हा,' असं अजित पवार अगदी नाजूक आवाजात म्हणाल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
याच विधानाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने पार्थ पवार प्रकरणावरुन अजित पवारांवर निशाणा साधला आहे. गुरुवारी दुपारी महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अजित पवार आणि पार्थ पवारांचे फोटो दिसत आहेत. या फोटोवर, "पार्थ, अरे कसा आहेस तू? जमीन खरेदी करतोय ना? स्टॅम्प ड्युटी माफ होतेय ना?" अशी ओळ लिहिलेली आहे.
नक्की पाहा >> 12 वीपर्यंत शिकलेले अजित पवार 105 कोटींचे मालक; एवढी संपत्ती कमवली कशी? Income चे 5 Source पाहून व्हाल थक्क
तर या फोटोला "एक लाख रुपये भांडवल असलेल्या पार्थ पवारांच्या कंपनीने 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. 21 कोटींचे मुद्रांक शुल्क फक्त दोन दिवसांत माफ करण्यात आले आहे. ही जमीन सरकारच्या ताब्यात होती. तिची "परस्पर विक्री" करण्यात आली आहे," अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
नक्की वाचा >> ₹500 च्या नोंदणीवरुन 300 कोटींची जमीन खरेदी करणारे पार्थ पवार किती श्रीमंत? जिजाई बंगला अन्...; संपत्तीचा तपशील समोर

"सरकारी जमीन खरेदी-विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे होत आहे," असं महाराष्ट्र विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.