...त्याच्या बापानी मांडली ना! पार्थ पवारांबाबत विचारले असता अजित पवार डायरेक्ट म्हणाले

चुकीच्या आरोपांमुळे बदनाही होतेय. पार्थ पवार यांच्याबाबत विचारले असता अजित पवार काहीशी संतापले. 

वनिता कांबळे | Updated: Nov 9, 2025, 01:52 PM IST
...त्याच्या बापानी मांडली ना! पार्थ पवारांबाबत विचारले असता अजित पवार डायरेक्ट म्हणाले

Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: पुण्याच्या  कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार केला. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.  उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार झाला. झी 24 तासने हा गैरव्यहार उघडकीस आणला. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली.  यानंतर पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या प्रकरणावर  पार्थ पवार यांनी जाहीरपणे भूमिका मांडलेली नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पार्थ पवार यांची पाठ राखण केली. 

मी माझ्या हातून कधीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही. माझे नातेवाईक असले तरीही अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करु नये. FIR दाखल झाला आहे, चौकशी सुरु आहे. सत्य समोर येईल. चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ज्यांच्या सह्या आहेत  त्यांची चौकशी सुरु असून गुन्हे दाखल आहेत. नुसते आकडे समोर आले असून आकड्यांवरुन आरोप केले जात आहेत. निवडणुका आल्या की आमच्यावर अनेक आरोप  होतात. आम्ही  सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो. कोणहीती चुक होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही काम करतो. माझ्या राजकीय कारकिर्दीत कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. माझ्या नावाने कुणीही गैर प्रकार करण्याचा प्रय्त्न करत असेल तर अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या प्रकरणात कुणालाही मदत करुन नये असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

पुणे कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांनी जाहीर भूमिका का मांडली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. यावेळी ते काहीशी संतापले. मी आहे ना? त्याचा बाप बोलला ना? असं अजित पवार स्पष्टपणे म्हणाले. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More