Pune Land Deal Case: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं कारण

Ajit Pawar On Koregaon Land Deal:पुणे जमीन प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 7, 2025, 07:14 PM IST
Pune Land Deal Case: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं कारण
Pune Land Deal Case why Fir will not filed against Parth Pawar ajit pawar gives clerification

Ajit Pawar On Koregaon Land Deal: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र (Parth Pawar) पार्थ पवार यांचं नाव पुण्यातील (Koregaon land Controversy) कोरेगाव पार्क नावाच्या ठिकाणी असणाऱ्या 40 एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सगळ्या प्रकरणावर अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. तसंच, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

कोरेगाव जमीन प्रकरणावर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. 'कोणी कोणाची फसवणूक केली. याची चौकशी होईल. कोणी सांगितल्यामुळं हे घडलं. कोणाचे फोन गेले होते. कुणी दबाव आणला होता का. आणला होता तर कोणी आणला होता. अधिकाऱ्यांनी असं कसं गेलं. याची चौकशी होईल,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

'मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता. मला माहिती असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं. मी नेहमी सांगतो जे काही असेल ते नियमानुसार करा. नियमाच्या बाहेर जाऊन कोणीही काही केलेले मला चालणार नाही. मी माझ्या कार्यालयातही प्रत्येक अधिकाऱ्यालाही विचारलं की तम्ही डीसीएम ऑफिसला फोन करुन दबाव आणला का. कोणीही कोणावर दबाव आणला नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

'ही जमीन सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. ती पूर्वीची महार वतनाची जमीन आहे. याबाबत चौकशी होईल. असं असताना इतर नोंदणी झाली कशी. कोणी केलं कोण त्याला जबाबदार आहे याची चौकशी होईल. तीन लोकांची एफआयरमध्ये नाव टाकली गेली आहे. त्यांची पण चौकशी केली जाईल, या कंपनीत पार्थ पवार असताना त्यांचं का नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले ज्यांनी कार्यालयात येऊन सह्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेले आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More