पुणे : पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८-१९ साठी ५ हजार ८७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असेल. आयुक्तांच्या अर्थसंकल्पापेक्षा ४७० कोटी रुपयांनी अधिकचं हे बजेट आहे. तर मागील वर्षीपेक्षा ४२ कोटी रुपयांनी कमी आहे. प्रथमच मागील वर्षीपेक्षा कमी बजेट मांडण्यात आलंय.


समान पाणीपुरवठा योजनेसाठी ३२० कोटी रुपये, शिवसृष्टीसाठी २५ कोटी रुपये, तर कचऱ्यासाठी ४७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. 


यात, रामटेकडीमधील ७५० टन कचऱ्यावर प्रक्रीया प्रकल्पाला आर्थिक तरतूद, नव्यानं समाविष्ट ११ गावांत अत्याधुनिक कचरा प्रक्रीया प्रकल्प उभारण्यात येतील. 


तर मेट्रोसाठी स्पष्ट तरतूद नाही. मात्र, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मागणीनुसार महापालिकेच्या वाट्याचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.