Pune Miraj Railway Doubling : पुणे-मिरज दुपदरीकरण कामातील सर्वात कठीण अशा शिंदवणे-आंबळे घाटाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. पुणे-सातारा 145 कि.मी. मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण होऊन 279 कि.मी. लांबीच्या पुणे-मिरज मार्गापैकी 258 कि. मी. अंतर आता कार्यान्वित झाले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत दुपदरीकरण पूर्ण होऊन या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढणार आहे.
मध्य रेल्वेने पुणे-मिरज दुपदरीकरण प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत पुण्याजवळ शिंदवणे - आंबळे घाटाचे 10कि.मी. दुपदरीकरण पूर्ण केले आहे. हा टप्पा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक, डोंगराळ, अवघड वळणांनी भरलेला व बांधकामासाठी खूप कठीण असल्यामुळे येथील रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण खूप कठीण होते. 17 जून 205 रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणी केल्यानंतर नवीन दहेरी मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली. 2017 पासून पुणे-मिरज दुपदरीकरणाचे काम सुरू असून, आता फक्त 22 कि.मी. काम बाकी आहे.
शिंदवणे-आंबळे दरम्यान काम पूर्ण करण्यासाठी 140 मीटर लांबीचा एक बोगदा बांधला. तीव्र उतार असल्याने कामासाठी अचूक योजना करावी लागली. 13 भागांत विभागलेला एक मोठा पूल बांधला. ज्यात सर्वांत उंच खांब 42 मीटर उंच आहे. हा पूल एका वर्षात पूर्ण झाला. यातील सर्वाधिक उंचीचा खांब हा 18.3 मीटर उंच आहे. 30लाख घनमीटर माती भरून उंच भराव तयार केला गेला आहे. 23 छोटे पूल या मार्गावर बांधले गेले. यात 16 तीव्र वळणे आहेत. शिंदवणे-आंबळेदरम्यान काम पूर्ण करण्यासाठी 140 मीटर लांबीचा एक बोगदा बांधला आहे. शिंदवणे - आंबळे घाटातील दुपदरीकरण झाल्यामुळे रेल्वे मार्गावरील गर्दी कमी होऊन गाड्या वेळेवर धावतील. दुपदरीकरणामुळे जास्त गाड्या धावणार असल्याने प्रवासी व मालगाड्यांची संख्या वाढणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
GER
135/9(20 ov)
|
VS |
TAN
89/1(10 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 192/4
|
VS |
MAW
120/7(20 ov)
|
Tanzania beat Malawi by 72 runs | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 144/8
|
VS |
GER
145/5(16.4 ov)
|
Germany beat Malawi by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.