पुण्यातील BJP आमदाराच्या मामाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती! धावत्या कारमध्येच...
MLA Yogesh Tilekar Mama Satish Wagh Murder Case: आमदाराच्या मामाचं 9 डिसेंबर रोजी सकाळी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
MLA Yogesh Tilekar Mama Satish Wagh Murder Case: भारतीय जनता पार्टचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर चालत्या गाडीतच खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालत्या गाडीत खून केल्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण केल्यानंतर धावत्या गाडीतच त्यांचा तिक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा सतीश वाघ यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्माला अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ यांच्या अपहरण व खून प्रकरणात पाच आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कारमध्ये दोघे आधीपासूनच होते
सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांनीच सतीश वाघ यांचे अपहरण केलं. ज्या गाडीत वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी दोन जणं आधीपासूनच होते, अशीही माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अन्य एकाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
अपहरणानंतर लगेच हत्या
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करत हत्या करण्यात आली होती. योगेश वाघ यांच्या शरीरावर अनेक वार तर डोक्यात लाकडी दांडके मारत हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. 9 डिसेंबर रोजी सकाळी अपहरण करत सतीश वाघ त्याच्या थोड्या वेळानंतरच हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिली. हत्या करत मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरुन शिंदवणे घाटात आणून टाकला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली केलेली. आता असाच घटनाक्रम समोर येत आहे. अपहरण केल्यानंतर काही तासातच सतीश वाघ यांची हत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमला अनेक पुरावे सापडले आहेत. त्यात रक्त लागलेले लाकडी दांडक्याचाही समावेश आहे. याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चौघांना त्बायात घेतलं आहे.
... त्यानंतर दोघांना अटक
पुणे क्राईम ब्रँच पथकाने 10 ते 15 जणांच्या चौकशीनंतर पवन शर्मा आणि नवनाथ गुळसाळे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात घेतलं आहे. या दोघांपैकी शर्मा हा मुख्य सूत्रधार ही असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांची 16 पथके आरोपीच्या मागावर आहेत. पुणे पोलिसांनी ह्यूमन इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोपींचा शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे.