मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांचा का होतोय संताप? एक निर्णय ठरतोय कारणीभूत....

Pune-Mumbai Expressway Toll : मुंबई- पुणे असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून, आता प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 19, 2025, 10:21 AM IST
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांचा का होतोय संताप? एक निर्णय ठरतोय कारणीभूत....
Pune Mumbai Expressway Toll price increase from 1 april 2025

Pune-Mumbai Expressway Toll : मुंबई पुणे असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या असून, आठवड्याच्या अखेरीसही या मार्गानं प्रवास करणाऱ्यांचा आकडा तुलनेनं मोठा असतो. आता मात्र हा प्रवास करणाऱ्या अनेकांच्याच अडचणी वाढल्या असून, शासनाच्या एका निर्णयामुळं प्रवाशांचा संताप होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

शासनाच्या कोणत्या निर्णयामुळं प्रवाशांचा संताप? 

प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता वाढील टोल रकमेचा फटका बसणार आहे. 1 एप्रिलपासून या महामार्गावर वाहनधारकांकडून टोलची वाढीव रक्कम आकारली जाणार असून, शासनानं यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. 

शासनाच्या या निर्णयानुसार चारचाकी वाहनांना या मार्गावरून प्रवासाच्या एका फेरीसाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी अर्थात परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांची वाढीव रक्कम भरावी लागणार आहे. इतकंच नव्हे तर, इतर श्रेणींतील वाहनांसाठी सरासरी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. 

हेसुद्धा वाचा : पृथ्वीवर परतल्या मात्र स्वत:च्या पायांवर उभ्या राहू शकत नाहीत Sunita Williams; आरोग्यावरही गंभीर परिणाम...

कुठे लागू होणार ही टोल दरवाढ? 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही टोल दरवाढ लागू होणार असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे. वाहनांवर फास्टॅग नसणाऱ्यांना टोल स्वरुपात दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. दरम्यान या टोलवाढीनंतर दरवर्षी होणाऱ्या या दरवाढीमुळं या निर्णयाचा निषेध करत सर्व महामार्गांवर प्रत्येक वर्षी ही दरवाढ का केली जाते असाच संतप्त सवासल  दरवर्षी सर्व महामार्गांवर टोलची दरवाढ का केली जात आहे? असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून केला जातोय.