'अजित पवारांचे नेते शिवसेना आणि काँग्रेसला जाऊन भेटले', सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा, 'संजय राऊतांनी तर...'

Supriya Sule on Ajit Pawar Mahavikas Aghadi Alliance: पुण्यात युतीसाठी अजित पवारांचे नेते शिवसेना आणि काँग्रेसला जाऊन भेटले होते. सगळं जमतच आलं होतं असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. संजय राऊतांनी काँग्रेस आणि आम्ही मुंबईत एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढावं म्हणून प्रयत्न केला अशी माहितीही त्यांनी दिली.   

शिवराज यादव | Updated: Jan 9, 2026, 02:25 PM IST
'अजित पवारांचे नेते शिवसेना आणि काँग्रेसला जाऊन भेटले', सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा, 'संजय राऊतांनी तर...'

Supriya Sule on Ajit Pawar Mahavikas Aghadi Alliance: पुण्यात युतीसाठी अजित पवारांचे नेते शिवसेना आणि काँग्रेसला जाऊन भेटले होते. सगळं जमतच आलं होतं असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तडजोड करताना युती तुटली. काही जागा मान्य नसल्याने बिनसलं असंही त्यांनी सांगितलं. संजय राऊतांनी काँग्रेस आणि आम्ही मुंबईत एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढावं म्हणून प्रयत्न केला अशी माहितीही त्यांनी दिली.  'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. 

Add Zee News as a Preferred Source

"मी महाविकास आघाडी आणि अजित पवार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. काँग्रेसही हो म्हणाली होती. काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष आणि माझी सविस्तर चर्चा झाली. आमच्या बैठकाही झाल्या. आमच्या पाच ते सहा बैठका झाल्या. अजित पवारांचे नेते शिवसेना आणि काँग्रेसला जाऊन भेटले होते. सगळं जमतच आलं होतं. माझ्याकडून नुसता होकार नव्हता तर प्रयत्नही होता. तडजोड करताना युती तुटली. काही जागा मान्य नसल्याने बिनसलं," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुंडांना तिकीट देणं किती योग्य? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या 'तक्रार करुन....'

 

"संजय राऊतांनीमुळेच आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यांनी फार कष्ट घेतले. संजय राऊतांनी काँग्रेस आणि आम्ही मुंबईत एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढावं म्हणून प्रयत्न केला. पण काँग्रेसची भूमिका वेगळी होती. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला  तिकीट मिळावी असा त्यांचा प्रयत्न होता," अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे त्यांनी म्हटलं की, "18 वर्षं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र एकत्र सत्तेत होती. पण आम्ही स्थानिक स्वराज्य एकत्र लढलो नाही. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढल्यास नवीन कार्यकर्ते निर्माण होत नाही, संधी मिळत नाही, यामुळे वेगळं लढतात. त्यामुळे काँग्रेसचं मत असू शकतं की, शून्यातून सगळ्याच कार्यकर्त्यांना संधी देऊ. त्यात काही गैर नाही".

'सर्व पक्षांनी एकत्र बसून काहीतरी नियम, लक्ष्मणरेषा आखण्याची वेळ'

अजित पवारांच्या पक्षाकडून गुंड गजा मारणे आणि आंदेकर कुटुंबाला देण्यात आलेल्या तिकिटांबद्दल विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "त्यांच्या कोट्यातून कोणाला तिकीट देणार आहेत हे माहिती नव्हतं. माझं म्हणणं आहे की, सर्वच पक्षांनी एकत्र बसून काहीतरी नियम, लक्ष्मणरेषा आखण्याची वेळ आली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पत्नीला दिलं असून, नवऱ्याला दिलं आहे. नवरा बायकोत एखादा नवऱ्याने चूक केली तर त्याचं खापर बाईला करावं लागतं. पण दरवेळी तिची चूक असते का? ती तिचं कर्तव्य म्हणून नवऱ्यासमोर उभी राहते".

'कोणत्याच पक्षाने गुंडांना तिकीट देऊ नये'

"आपण त्याची तक्रार करुन या प्रकरणात गृह मंत्रालयाने मध्यस्थी केली पाहिजे. कोणत्याच पक्षाने अशा बाबतीत संवेदनशील असंलं पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी लक्ष्मपणरेषा आखली पाहिजे. इलेक्टोरल रिफॉर्म्सबद्दल मी संसदेतही मुद्दा मांडला आहे. त्यांनी कोणाला तिकीट द्यावं हा त्यांचा अधिकार आहे. पण कोणत्याच पक्षाने गुंडांना तिकीट देऊ नये. लोकशाहीसाठी हे घातकच आहे. हे सगळीकडे होत असून, कुठेतरी थांबलं पाहिजे," असं मत त्यांनी मांडलं. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More