नवीन मतदारांचे होणार नुकसान,नाही मिळणार मतदानाचा हक्क; प्रशासनाचा मोठा निर्णय!

Election News: तुम्हीदेखील 1 जुलैच्या नंतर मतदार नोंदणी केली असेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क मिळणार नाही.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 11, 2025, 05:48 PM IST
नवीन मतदारांचे होणार नुकसान,नाही मिळणार मतदानाचा हक्क; प्रशासनाचा मोठा निर्णय!
नवीन मतदार

Election News: पहिल्यांदा मतदान करायला जाणाऱ्या पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तुम्हीदेखील 1 जुलैच्या नंतर मतदार नोंदणी केली असेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क मिळणार नाही.काय आहे नेमकं कारण? कोणी घेतलाय हा निर्णय? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी अंतिम केलेली मतदार यादी वापरली जाणार आहे. या यादीत नाव नसलेल्या आणि त्यानंतर नोंदणी केलेल्या नवीन मतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.  पुण्यातील सुमारे 35 लाख मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावू शकतील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि व्यवस्थित व्हावी यासाठी प्रशासनाने कठोर नियम लागू केल्याची माहिती आयोगाने दिलीय.

मतदार यादीचा वापर

यंदा केवळ राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मतदार यादीच वापरली जाईल. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यादी घेऊन ती प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रानिहाय विभागली जायची. मात्र, यंदा स्थानिक पातळीवर यादी घेण्यास मनाई आहे. ही यादी महापालिकेला प्राप्त झाली असून, लवकरच प्रभागनिहाय वर्गीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.

प्रभाग रचना आणि आरक्षण

महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळाली आहे. येत्या काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होईल. त्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी माहिती देण्यात आलीय.

निवडणुकीची रचना

2011 च्या लोकसंख्येच्या आधारे ही निवडणूक होणार आहे. एकूण 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडले जातील. यापैकी 40 प्रभाग चार-सदस्यीय, तर एक प्रभाग (प्रभाग क्र. 38: बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव) पाच-सदस्यीय असेल, जिथे लोकसंख्या सुमारे 123000 आहे.

नवीन मतदारांचे नुकसान

1 जुलै 2025 नंतर नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. यामुळे नव्याने मतदार झालेल्यांना निवडणुकीत सहभागी होता येणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. 

प्रशासनाची तयारी

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मतदार यादीचे वर्गीकरण, प्रभागनिहाय आरक्षण आणि कर्मचारी प्रशिक्षण यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. या निर्णयामुळे निवडणूक व्यवस्थित आणि निष्पक्ष होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

FAQ

प्रश्न: पुणे महापालिका निवडणुकीत कोणत्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळेल?

उत्तर: 1 जुलै 2025 रोजी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या मतदार यादीतील सुमारे 35 लाख मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळेल. या तारखेनंतर नोंदणी केलेल्या नवीन मतदारांना मतदानाची परवानगी नाही.

प्रश्न: मतदार यादी आणि प्रभाग रचनेबाबत प्रशासनाने काय निर्णय घेतले आहेत?

उत्तर: यंदा केवळ राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मतदार यादी वापरली जाईल, स्थानिक पातळीवर यादी घेण्यास बंदी आहे. महापालिकेला यादी मिळाली असून, प्रभागनिहाय वर्गीकरण लवकरच सुरू होईल. अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळाली असून, येत्या काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होईल.

प्रश्न: निवडणुकीची रचना कशी असेल आणि कोणत्या प्रभागात जास्त नगरसेवक निवडले जातील?

उत्तर: 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे निवडणूक होईल, ज्यात 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडले जातील. 40 प्रभाग चार-सदस्यीय असतील, तर प्रभाग क्र. 38 (बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव) पाच-सदस्यीय असेल, जिथे लोकसंख्या सुमारे 1,23,000 आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More