Pune Narsapur Rape Case: पुण्यातील नरसापूर येथे चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी जनतेमध्ये संताप आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यादरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबियांना पत्र लिहून कारवाईसंदर्भात लेखी आश्वासन दिलं आहे.

District Collector Letter to Pune Rape Victim Family: पुण्यातील नरसापूर येथे चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी जनतेमध्ये संताप आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यादरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबियांना पत्र लिहून कारवाईसंदर्भात लेखी आश्वासन दिलं आहे. आरोपीला मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल असं त्यांनी आश्वासन त्यांनी पत्रातून दिलं आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पीडितेच्या कुटुंबाला पत्र पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी स्पेशल फास्टट्रॅक कोर्ट नेमून कारवाई केली जाईल. आरोपीला मृत्युदंडच होणार असं आश्वासन दिलं आहे. कुटुंबाला सर्व शासकीय मदत पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
नसरापूर अत्याचार पीडितेचं चार्जशीट 15 दिवसातच दाखल करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रयत्नशील आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप सिंह गिल दिलेला शब्द पाळणार आहेत. परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. साक्षी, पुरावे गोळा करण्यासाठी तपास पथक नसरापुरात तळ ठोकून आहे. ही केस पॉक्सो कोर्टातही तेवढ्याच सक्षमकेनं चालावी, यासाठी स्पेशल पीपी मिळवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रयत्नशील आहेत.
पीडित मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसरापूर येथील मुलीच्या लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनात आल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने शविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे.
नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सीसीटीव्ही निर्णायक ठरला आहे. नराधम भीमराव कांबळे मोबाईलच वापरत नव्हता असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. पूर्वी केलेल्या दोन गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर मोबाईल वापरणं बंद केलं होतं.
भोर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तो शेतीची आणि मजुरीची काम करायचा. या प्रकरणात तपास सुरू असताना सीसीटीव्ही सापडला नसता तर आरोपीला शोधणं कठीण झालं असतं. कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाईल सगळ्यात महत्त्वाचं ठरतात. त्यात सुरुवातीला आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात येतो. त्यानंतर सीसीटीव्ही चेक केला जातो. मात्र या नराधमाकडे मोबाईलच नसल्यामुळे सीसीटीव्ही निर्णायक ठरला आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर मुख्यमंत्र्यांची नजर आहे. नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तपासातील प्रगती, गोळा केलेले पुरावे आणि तांत्रिक बाबींबाबत मुख्यमंत्री सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना त्यांच्याकडून दिल्या जात आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तपासाचे वेळोवेळचे अपडेट्स घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.