पुण्यातील नरसापूर चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबियांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. आरोपीच्या पत्नी व मुलाने नराधमाची त्याच गोठ्यात ठेचून मारण्याची मागणी केली आहे. काय आहेत भावांना?

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर तीन चार दिवसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आरोपीला मारुन टाका, त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारा अशी संपप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आरोपी भीमराव कांबळे याने चार वर्षांच्या चिमुकलीवर गुरांच्या गोठ्यात लैंगिक अत्याचार केला. त्याच ठिकाणी त्या मुलीला दगडाने ठेचून तिची हत्या केली आणि आपलं घाणेरडं कृत्य लपवण्यासाठी त्याने चिमुरडीचा मृतदेह शेणात लपवला. पत्नीचं असं म्हणणं आहे की, आरोपीला त्याच ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.
पत्नीने संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर मुलाने तो माझा बाप आहे हीच माझी चूक असल्याचं मुलाने सांगितलं आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मुलाने केली आहे.
आरोपीच्या पत्नीने अत्यंत भावूक होत आपली व्यथा मांडली. त्या चिमुरड्या जिवाच्या जाण्याने तिला होणारा त्रास व्यक्त करताना ती म्हणाली, "मला अकरा नातवंडं आहेत. त्या निष्पाप बाळाच्या आत्म्याला काय वाटलं असेल? तिच्या आईच्या काळजाचा तुकडा गेला, तिला काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही."
यावेळी तिने एक महत्त्वाचा खुलासा केला की, आरोपी पतीसोबत त्यांचा गेल्या १० वर्षांपासून कोणताही संबंध नाही. ती म्हणाली, "तो आमच्यासोबत राहत नाही. मी आणि माझा मुलगा दोघेच एकत्र राहतो. या १० वर्षांत आम्ही अनेकदा त्याला घरी बोलावण्याचा, नीट वागण्याचा प्रयत्न केला. पण तो नेहमी 'तुझं तू बघ' असं म्हणून आम्हाला झिडकारायचा."
आरोपीच्या कृत्यामुळे कुटुंबावर आलेली नामुष्की आणि पीडित कुटुंबाबद्दल वाटणारी सहानुभूती तिच्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवत होती. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी आणि न्याय मोठा असल्याचे सांगत तिने प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.