Video : 'कुठं जाऊन बसता...', भल्या पहाटे अधिकाऱ्यांची अजित पवारांकडून कानउघडणी

Ajit Pawar Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. भल्या पहाटेचे त्यांचे दौरे म्हणजे विशेष चर्चेचा विषय.   

सायली पाटील | Updated: Oct 11, 2025, 09:04 AM IST
Video : 'कुठं जाऊन बसता...', भल्या पहाटे अधिकाऱ्यांची अजित पवारांकडून कानउघडणी
pune news dcm ajit pawar visits khadakwasla warje slams PMRDA officers latest update

Ajit Pawar Video : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अजित पवार यांनी कायमच त्यांच्या कार्यपद्धतीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यातच भल्या पहाटे आपला जिल्हा असो किंवा इतर महत्त्वाची ठिकाणं असो, पवारांचा दौरा लक्ष वेधून जातो आणि पुण्यातील दौरासुद्धा यास अपवाद ठरला नाही. 

Add Zee News as a Preferred Source

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पहाटे खडकवासला परिसरातील अहिरे गावात विकास कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. दरम्यान, त्यांनी PMRDA अधिकाऱ्यांची कानउघडणीसुद्धा केली आणि पुन्हा एकदा दौऱ्यांदरम्यान वक्तशीर नसणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी झापताच या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला. 

नेहमीप्रमाणं अजित पवार पहाटेच्याच वेळी दौऱ्याच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी क्षणात पाहणीच्या कामांना सुरुवात केली. दरम्यान अजित पवारांनी PMRDA अधिकाऱ्यांना झापलं. रिंग रोड आणि बाकी रस्त्यांबाबत चर्चा सुरू असताना 'वसईकर कुठ जाऊन बसता हो तुम्ही', असं म्हणत अधिकाऱ्याला झापलं. 2 मिनिटं उशीर का झाल्याचं विचारत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

दौऱ्याचं कारण काय? 

पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवार पाहणी करण्यासाठी अजित पवारांचा हा दौऱा पार पडला असून, वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात केली. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते. 

वारजेनंतर अजित पवार शिवणे नांदेड़ सिटी पुलाची पाहणी करून धायरीतील ट्रँफिक समस्या सोडवण्यासाठी डिपी रोड बनवण्याची अनेक दिवसांची मागणी हे त्याच प्रस्तावित धायरी डीपी रोड ची अजित पवार पाहणी करण्यासाठी आले. ज्यानंतर काञज चौकातील उड्डाण पुलाच्या कामाचा आढावाही त्यांच्या दृष्टीक्षेपात होता. 

मनपा निवडणुकीच्या तोंडावर खडकवासला भागातील रस्ते समस्यांचा आढावा घेण्यालाही त्यांनी प्राधान्य दिलं असून, खडकवासला मतदारसंघातील रस्ते, पूल समस्यांची पाहणी केल्यानंतर अजित पवार याच परिसरातील नवले लॉन्सला जन संवाद मेळाव्याला त्यांची उपस्थिती असेल. 

FAQ

अजित पवारांनी कोणत्या ठिकाणी विकास कामांची पाहणी केली?
अजित पवार यांनी शनिवारी पहाटे खडकवासला परिसरातील अहिरे गावात विकास कामांची पाहणी केली. यानंतर वारजे भागातील चौधरी चौकापासून सुरुवात करून वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची पाहणी केली. 

दौऱ्याचे मुख्य कारण काय होते?
दौऱ्याचे मुख्य कारण पुण्यातील वारजे आणि खडकवासला भागातील विविध विकास कामांची पाहणी करणे होते. यात रस्ते, पूल आणि वाहतूक समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला.

दौऱ्यादरम्यान कोण उपस्थित होते?
दौऱ्यादरम्यान पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते. अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या आणि वक्तशीर नसल्याबद्दल त्यांना फटकारले.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More