Pune News : हिंजवडीच्या फेज वन मधील युमो ग्राफिक्स कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा कंपनीचा प्रवास शेवटचा असणार आहे याची कल्पना ही नसेल. पुण्यातील वारजे आणि परिसरातून नेहमी प्रमाणे हे कर्मचारी हिंजवडी मधल्या फेज वन मधल्या कंपनी कडे प्रवासासाठी निघाले. जवडीच्या विप्रो सर्कलच्या पुढे सकाळी आठच्या सुमाराला ड्रायव्हरच्या पायाजवळ आग लागली. ड्रायव्हर आणि बाजूचे कर्मचारी खाली उतरले. पण मागचा दरवाजा न उघडल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटना स्थळाला भेट देत पाहणी केली. टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये 14 जण प्रवास करत होते. या घटनेत सहा जण जखमी झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे.. या घटनेनंतर हिंजवडी आय टी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अनेक नामवंत कंपन्या असलेल्या हिंजवडी मध्ये या हजारो कर्मचारी अशाच पद्धतीने टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करत असतात. त्यांच्या प्रवासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची वेळोवेळी तपासणी केली जात असल्याचं प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात येत असल्याची सावरा सावर केलीय.
कंपन्यांनी ही त्यांच्या पातळीवर वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करावी असा सल्ला ही प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिला. एकूणच काय तर प्रादेशिक परिवहन विभागाकडून आता हिंजवडी मधल्या वाहतूक संघटनेची बैठक घेत सुरक्षिततेसंबंधी सूचना केल्या जाणार आहेत. पण त्यासाठी चार कामगारांच्या मृत्यूची वाट पाहण्याची गरज काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.