)
Pune News : पुण्यातील खडकवासला एनडीएत अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत आणखी एक धक्कादायक घटना घडली असून, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार पोहण्याच्या सरावादरम्यान ही दुर्घटना घडली. आदित्य यादव असं या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव सांगण्यात येत आहे.
पोहण्याच्या सरावादरम्यान आदित्य अचानक बेशुद्ध झाला, यानंतर तिथं असणाऱ्या लाईफ गार्ड्सने त्याला तत्काळ सीपीआर दिला. मात्र तोपर्यत आदित्यचा मृत्यू झाला होता. गेल्या 2 आठवड्यात NDAतील दुसऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान पोलिसांकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
18 वर्षीय आदित्य 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोहण्याचा सराव करत असताना ही घटना घडली. सूत्रांनी एनडीएच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार पोहण्याच्या अधिक सराव आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा तिथं सराव घेण्यात येत होता, जिथं प्रशिक्षकही उपस्थित होते. मात्र आदित्य पूलमध्येच अचानक बेशुद्ध होऊन निपचित पडला. त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करूनही जीवरक्षकांना यश मिळालं नाही. स्थानिक पोलिसांसह कॅडेटच्या पालकांनाही या दुर्दैवी घटनेची माहिती दिली असून, त्या प्रसंगी नेमकं का घडलं, आदित्य बेशुद्ध कसा झाला यासंदर्भातील तपासणी केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच देशसेवेसाठी सज्ज होऊ पाहणाऱ्या एनडीएतील 18 वर्षीय कॅडेटनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. अंतरिक्ष कुमार सिंह असं या तरुणाचं नाव असून, हा तरूण मुळचा उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील रहिवासी असल्याची माहिती असून, त्याच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती समोर आली होती.
आदित्य यादव यांच्या मृत्यूची घटना कुठे आणि कधी घडली?
ही घटना 23 ऑक्टोबर 20225 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता एनडीएच्या खडकवासला येथील पूलमध्ये घडली. आदित्य धनराज यादव (18 वर्षे), बिहारचे रहिवासी असलेले पहिल्या टर्मचे कॅडेट, पोहण्याच्या सरावादरम्यान अचानक बेशुद्ध झाले आणि पूलच्या पृष्ठभागावर स्थिर अवस्थेत आढळले.
घटनेची नेमकी माहिती काय आहे?
पोहण्याच्या सरावासाठी उमेदवारांना पूलच्या रुंदीच्या दिशेने पोहणे करावे लागत होते. प्रशिक्षक आणि जीवरक्षक उपस्थित असतानाही आदित्य अचानक निरीश्वर अवस्थेत दिसले.
मृत्यूचे कारण काय?
प्राथमिकदृष्ट्या बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र नेमके कारण (जसे हृदयविकार, श्वास कमी होणे इ.) जाणून घेण्यासाठी एनडीएने औपचारिक चौकशी (Court of Inquiry) नेमली आहे. पोलीसही तपास करत आहेत.