Pune Police Registered Case in Parth Pawar Land Deal Case: पुण्याच्या कोरेगाव पार्क जवळील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आता चौकशी होणार आहे.. झी २४तासनं पुण्यातील हा जमीन विक्रीचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. झी २४ तासने समोर आणलेल्या या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली. दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या तरी पार्थ पवार यांचे नाव फिर्यादीने तक्रारीत दिलेले नाही त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्टँम्प ड्युटी बुडवल्याचा तपास होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
शीतल तेजवानी पॉवर ऑफ अटर्नी आहेत. त्यांन जमीन खरेदी लिहून दिली आहे. लिहून घेणारे दिग्विजय यांना आरोपी करण्यात आलं आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार अधिकचा तपास केला जाईल. तारू हे सब रजिस्ट्रार होते असंही पोलिसांनी सांगितलं.
धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे रहिवासी दिग्विजय अमरसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भावाचा तो मुलगा आहे.
अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ-बहिण आहेत. मात्र, अमरसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील यांच्यात कौटुंबिक सौहार्द नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये कोणतेही आर्थिक संबंध किंवा संयुक्त उद्योग नव्हते.
दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे म्हणजेच अजित पवार यांच्या घरी वाढले. त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील बिबेवाडी येथे झाले, तर पुढील शिक्षण एमआयटी महाविद्यालयातून बी.ए. पदवीपर्यंत पूर्ण केले. सध्या दिग्विजय पाटील हे आई आणि आजीसह पुण्यात राहतात. तो पार्थ पवार याचा जवळचा मित्र असून दोघे बिझनेस पार्टनर आहेत.
पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणात शीतल तेजवानी हिनं मोठी भूमिका बजावली. शीतल तेजवानीनं जमीन ताब्यात घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नीचं हत्यार वापरलं. तिनं जमीन थेट नावावर करण्यासाठी वेगवेगळे फंडेही वापरले. पार्थ अजित पवार यांची या प्रकरणात जेवढी महत्वाची भूमिका आहे तेवढीच महत्वाची भूमिका शीतल तेजवानीनं बजावलीये.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.