Ajit Pawar Epic Reply To Women Video: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत. राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यामध्ये अजित पवार हे सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीगाठींदरम्यान अनेक उत्साही समर्थक आणि कार्यकर्ते अजित पवारांना भेटत आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला भेटल्यानंतर अनेक कार्यकर्ते काही ना काही भेटवस्तू देतात. अनेकदा या भेटवस्तू पाहून नेत्यांनाही काय बोलावं कळत नाही. असाच काहीसा प्रकार आज अजित पवारांबरोबर घडला.
अजित पवार आज धनकवडीत राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यावर असताना बारामतीच्या एका महिलेने त्यांना खास भेट दिली. या लाडक्या बहिणीने उपमुख्यमंत्र्यांना शेवग्याच्या शेंगा भेट म्हणून दिल्या. या महिला समर्थकाने अजित पवारांना त्यांच्या गाडीजवळच गाठलं. अजित पवार गाडीमधून उतरुन काही पावलं पुढे चालथ आल्यानंतर ही महिला पुढे आली. तिच्या हातात एक पिशवी होती ज्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि काही भाज्या होत्या. ती पिशवी या महिलेने अजित पवारांच्या हातात टेकवली.
"दादा आम्ही बारामतीचेच आहोत," असं ही महिला म्हणाली. त्यावर अजित पवारांनी बारातमीच्या कुठल्या असं विचारलं असता त्या महिलेनं गावाचं नाव सांगितलं. या महिलेने अजित पवारांच्या हातात भाजीची पिशवी देत, "ही भाजी तुम्हाला आवडते असं आम्हाला बोलण्यातून कळलं. त्यामुळे तुम्ही ही भाजी तुम्ही करुन खा," असं अगदी प्रेमाने सांगितलं. अजित पवारांनी भाजीची ही पिशवी घेत मागे उभ्या असलेल्या आपल्या सुरक्षारक्षकाच्या हाती सोपवली.
अजित पवार हे त्यांच्या मिश्कील टीप्पण्या आणि टोल्यांसाठी ओळखले जातात. सार्वजनिक सभा असो, पत्रकार परिषद असो किंवा कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना केलेली विधानं असो अजित पवार हे एखादाच असा टोला मारतात की उपस्थितांमध्ये हशा पिकल्याशिवाय राहत नाही. असाच रिप्लाय अजित पवारांनी या प्रेमाने शेवग्याच्या शेंगा देणाऱ्या लाडक्या बहिणीला दिला. प्रेमाने दिलेली भाजी स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी या लाडक्या बहिणीसमोर हात जोडत, "बायकोला सांगतो बहिणीने भाजी दिली आहे. आता तू बनवून मला खायला घाल," असं म्हटलं आणि सर्वच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More
LIVE|
IND
52/0(4.5 ov)
|
VS |
AUS
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.