पुणे बलात्कार प्रकरणात विचित्र अपडेट; आरोपीच्या वकिलाचे अपहरण करुन त्यांना दिवे घाटात नेले आणि....

पुणे बलात्कार प्रकरणात विचित्र अपडेट समोर आली आहे. आरोपीच्या वकिलाचे अपहरण करुन त्यांना मारहाण करण्यात आली आहे.   

वनिता कांबळे | Updated: Mar 18, 2025, 03:49 PM IST
पुणे बलात्कार प्रकरणात विचित्र अपडेट; आरोपीच्या वकिलाचे अपहरण करुन त्यांना दिवे घाटात नेले आणि....

Pune Swargate Rape: पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणात विचित्र अपडेट समोर आली आहे. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरण करुन त्यांना दिवे घाटात नेऊस मारहाण करण्ायत आल्याची माहिती देखील समोर आली आहे. मारहाण करुन आरोपी फरार झाले. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 

26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली होती.  तरुणी पुण्याच्या स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तरुणी एकटी बसल्याचं दिसल्यानंतर आरोपीनं तिला बोलण्यात गुंतवत एका शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. दत्ता गाडे असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे फरार झाला .तब्बल 75 तासांनी पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडेला गुनाट गावातून अटक केली. 

आरोपी दत्ता गोडेचे एक वकील साहील डोंगरे यांच्यावर हल्ला झाला आहे. 17 मार्च रोजी संध्याकाळी हडपसर येथुन डोंगरे यांचे अपहरण करुन दिवे घाटात नेण्यात आले होते. घाटात त्यांना मारहाण करुन तिथेच त्यांना सोडुन देण्यात आले.  मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  हल्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. डोंगरे यांच्यावर आता  ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

डोंगरे  हे आरोपी ⁠दत्ता गोडेचे मुख्य वकील वाजीद खान यांचे  सहायक वकील आहेत. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु असताना आरोपीचे वकिल वाजीद खान यांनी पिडितेला प्रश्न विचारत अनेक दावे केले होते. जबरदस्तीने काहीही केले गेले नाही असा दावा त्यांनी केला होता.  कथित घटना सकाळी घडली. तरुणी ओरडू शकली असती आणि मदत मागू शकली असती. जबरदस्तीने काहीही केले गेले नाही," असे वकील वाजिद खान म्हणाले.