मानवतेच्या आणि ज्ञान पाजळणाऱ्या रील्स तयार करून समाज प्रबोधन करणाऱ्या पंडित वर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यात विनयभंग सह महिला पत्रकाराची सहमती नसताना व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात झालेल्या "गुलाबो गँग" च्या आंदोलनावेळी संतोष पंडितकडून महिला पत्रकाराशी असभ्य वर्तवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महिला पत्रकाराने फिर्याद दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३० मार्च रोजी पुण्यातील ग्राहक पेठेसमोर घडला. सोमवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या संगिता तिवारी या नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाच्या विरोधात आंदोलन करत होत्या. दरम्यान, यातील फिर्यादी या पत्रकार या नात्याने आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी तेथे उपस्थित होत्या. यावेळी संतोष पंडीत त्याठिकाणी आला, "तुमच्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे," असे म्हणुन पत्रकारांविषयी अर्वाच्च भाषा वापरुन शिवीगाळ करुन यातील फिर्यादी यांचे अंगावरील कपड्यांवरुन अश्लिल शेरेबाजी केली. तसंच त्याने त्याच्या फोनमध्ये चित्रीकरण केले व आंदोलनकर्त्या महिलांचे अंगावर धावुन जावुन शिवीगाळ व दमदाटी केली
पंडित वर पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ३५२, ३५१ (२) आणि २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून संतोष पंडित याच्या विरोधात इतर लोकांच्या काही तक्रारी असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.