विठ्ठलाचे दर्शन घेतो पण, या घटनेची प्रसिद्धी आवडत नाही: शरद पवार
पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.
पुणे: मी पंढरपूरला जाऊन पांडूरंगाचं दर्शन घेतो, पण त्याचा फोटो एखाद्या पेपरमध्ये यावा, ते मला आवडत नाही, असं सांगत शरद पवार यांनी विठ्ठल भक्तीचं अवडंबर करणाऱ्यांना टोला लगावला. ज्ञानोबा- तुकोबांच्या पालख्यां पुण्यात मुक्कामी असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित यांनी त्यांचं दर्शन घेतलं. या पार्श्वभूमिवर पवार यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याबद्दल चर्चा सुरु झालीय.
ह.भ.प. शामसुंदर सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते पुण्यात झालं. या कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते. या वेळी बोलताना पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.