Pune Swargate Rape: पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. पुणे स्वारगेट ST डेपो मधील बलात्कार पिडीत महिलेने मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परीषद उपसभापती निलम गोर्हे यांनी भेट घेतली. यावेळी तिला न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले.
बलात्कार प्रकरणातीस आरोपीला अटक झाली असली तर सुनावणी दरम्यान पिडीतेलाच उलट प्रश्न विचारले जात आहेत. लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लगावे यासाठी पीडित महिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परीषद उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाली.
पिडीत महिलेच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. यावेळी पिडीत महिलेने तीची व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परीषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे मांडली. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी पिडीत महिलेने केली.
पिडीत महिलेची व्यथा एैकल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीला न्यायासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली. राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिडीत महिलेला सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील स्वारगेट येथील घटनेच्या संदर्भात न्याया बाबत विधान परीषद उपसभापती निलम गोर्हे यांनी संपर्क केला आहे.
26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आहे. तरुणी पुण्याच्या स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तरुणी एकटी बसल्याचं दिसल्यानंतर आरोपीनं तिला बोलण्यात गुंतवत एका शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झाला.तब्बल 75 तासांनी पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडेला गुनाट गावातून अटक केली.