)
Pune Traffic Jams After Diwali : पुण्यातील ट्रॅफिक जॅमने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर मोठ्या संख्येने लोक पुण्यात परत येत आहेत. यामुळे पुण्यात येणाऱ्या सर्व महामार्गांवर वाहने जागच्या जागी थांबल्याचे पहायला मिळाले,. 40 KM साठी 4 तासांचा प्रवास करावा लागला. अनेक ठिकाणी 10 KM वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हजारो वाहन चालक या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक पोलिसांनी आधीच या वाहतूक कोंडीचा अलर्ट दिला होता.
नोकरी तसेच शिक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच भारतातील अनेक राज्यातील लोक पुण्यात वास्तव्यास आहेत. दिवाळी निमित्ताने अनेक जण आपल्या घरी गेले होते. दिवाळी संपल्यानंतर पुण्यात परतणाऱ्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंजी झाली. दिवाळी संपल्यानंतर पुण्यात वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता पुणे वाहतूक पोलिसांनी वर्तवली होती. पुण्यातील प्रमुख महामार्गांवर संभाव्य गर्दीचा इशारा देखील देण्यात आला होता.
पुणे राज्य महामार्ग पोलिस अधीक्षक, पिंपरी-चिंचवड वाहतूक आयुक्त आणि पुणे शहर वाहतूक उपायुक्त यांनी संयुक्तपणे एक निवदेन जारी केले होते. 24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान वाहतूक कोंडीचा अलर्ट देण्यात आला होता. बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्ग (NH-48) कोल्हापुरातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदरच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली होती. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच-५०) नाशिक ते पुणे मार्गे चाकण या मार्गावर भयानक वाहतूक कोंडी जाली होती. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६५) सोलापूरहून पुणे आणि आसपासच्या परिसराकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या 5 KM जास्त लांब रांग लागली होती.
रहदारी टाळण्यासाठी, गुगल मॅप्स उघडून किंवा स्थानिकांना दिशानिर्देश विचारून प्रमुख महामार्ग टाळा. मुंबई-पुणे मोटरवे, पुणे-बेंगळुरू, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक किंवा समृद्धी महामार्गांवर लांब रांगेत थांबण्याऐवजी, तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करा. या वाहतूक कोंडीपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकाळी लवकर, म्हणजे पहाटे किंवा मध्यरात्रीपूर्वी तुमचा प्रवास सुरू करा असा सूचना पोलिसांनी केल्या होत्या. गुगल मॅमवर संपूर्ण रेड म्हणजेच वाहतूक कोंडी दाखवण्यात आली. रात्री तसेच पहाटे निघालेले प्रवासी वाहूक कोंडीत अडकले होते.
FAQ
1 पुण्यात दिवाळीनंतर वाहतूक कोंडी का झाली?
दिवाळीच्या सुट्टीनंतर मोठ्या संख्येने लोक नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात परत येत असल्याने ही कोंडी झाली. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील इतर राज्यांमधून आलेले लोक दिवाळीला घरी गेले होते आणि परतण्याच्या गर्दीमुळे प्रमुख महामार्गांवर वाहने जागच्या जागी थांबली. यामुळे ४० किमी प्रवासासाठी ४ तास लागले आणि अनेक ठिकाणी १० किमी लांब रांगा लागल्या.
2. कोणत्या महामार्गांवर सर्वाधिक वाहतूक कोंडी झाली?
बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वर कोल्हापूर ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर दिशेने कोंडी झाली. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH-50) वर नाशिक ते चाकणपर्यंत भयानक कोंडी होती. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH-65) वर सोलापूरहून पुणे आणि आसपासच्या भागाकडे येणाऱ्या मार्गावर ५ किमीपेक्षा जास्त लांब रांगा लागल्या.
3 वाहतूक पोलिसांनी कधी आणि कसा अलर्ट दिला होता?
पुणे राज्य महामार्ग पोलिस अधीक्षक, पिंपरी-चिंचवड वाहतूक आयुक्त आणि पुणे शहर वाहतूक उपायुक्त यांनी संयुक्तपणे निवेदन जारी केले. २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक कोंडीचा अलर्ट देण्यात आला होता. पुण्यातील प्रमुख महामार्गांवर संभाव्य गर्दीचा इशारा दिला गेला होता.