Radhakrishna Vikhe Patil: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना विखे पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकरी आधी कर्ज काढतात आणि नंतर कर्जमाफी मागतात असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. यावरून विरोधकांसह शेतकरी संघटनांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या विधानामुळे अजित पवार अडचणीत आले होते. तो वाद संपण्याआधीच आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कर्जमाफीवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मात्र काहीतरी चूकल्याचं लक्षात येताच विखे पाटील यांनी तत्काळ सारवासारवदेखील करण्याचा प्रयत्न केला.
विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेमधूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची हौस नसते. मात्र नैसर्गिक संकटापायी नाईलाजानं शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहतो. असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी विखे यांच्या वक्तव्याशी असमर्थन दाखवलं आहे. तर किसान सभेच्या वतीनंही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शेतकऱ्यांना सारखं फुकट कशाला हवं आहे. सारखं कर्जमाफीची सवय लागली असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अजितदादा अडचणीत आले होते.
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. आधीच नैसर्गिक संकटानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. त्यातच दुर्देवानं आता नेतेमंडळी अशी वक्तव्यं करून शेतकऱ्यालाच अपमानित करत आहेत.
FAQ
1. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना म्हटलं की, “शेतकरी आधी कर्ज काढतात आणि नंतर कर्जमाफी मागतात.” या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
2. या वक्तव्यावर प्रतिक्रिया कोणत्या नेत्यांकडून आल्या आहेत?
शिवसेना नेते संजय शिरसाट आणि किसान सभेने विखे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची हौस नसते, तर ते नैसर्गिक संकटामुळे नाईलाजानं कर्ज घेतात.
3. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं का?
होय, वाद निर्माण झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तत्काळ सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि आपला हेतू शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता, असं स्पष्ट केलं.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.