Rahul Gandhi On Koregaon Park Land Deal: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र (Parth Pawar) पार्थ पवार यांचं नाव पुण्यातील (Koregaon land Controversy) कोरेगाव पार्क नावाच्या ठिकाणी असणाऱ्या 40 एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून विरोधीपक्षदेखील आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात 1800 कोटींची सरकारी जमीन जी दलितांसाठी आरक्षित होती. ती फक्त 300 कोटींना मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीसाठी विकण्यात आली. इतकंच नव्हे तर स्टॅम्प ड्युटीदेखील हटवण्यात आली. एकीकडे लूट आणि त्यावर कायदेशीर सूटही देण्यात आली.
जे सरकार स्वतः व्होट चोरी करुन सत्तेत आले आहे त्या सरकारची ही जमीन चोरी आहे. त्यांना माहितीये कितीही लूटून नेलं तरी परत व्होटी चोरी करुन सत्तेत परत येता येईल. ना लोकशाहीची चिंता, ना जनतेची, ना दलितांच्या अधिकाराची, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच, मोदींची तुमचं मौन खूप काही सांगून जातंय. दलितांचे आणि वंचितांचे हक्क हडपणाऱ्या या लुटारुंवर तुमचं सरकार टिकून आहे म्हणून तुम्ही शांत आहात का?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

उत्तर: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर सरकारी जमीन, जी दलितांसाठी आरक्षित होती, ती अवघ्या ₹300 कोटींना मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला विकल्याचा आणि त्यावरची स्टॅम्प ड्युटीदेखील हटवल्याचा हा गैरव्यवहार आहे.
उत्तर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
उत्तर: राहुल गांधी यांच्या ट्विटनुसार, या जमिनीची मूळ किंमत ₹1,800 कोटी होती.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.