Raigad Crime : आयुर्वेदिक डॉक्टर, रुग्ण म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला फसवून शरीर संबंध अन्... रायगडमध्ये भयंकर घडलं

रायगडच्या अलिबागमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. एका आयुर्वेदिक डॉक्टरने आपल्या रुग्ण तरुणीसोबत अतिशय धक्कादायक प्रकार केला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 16, 2025, 11:17 AM IST
Raigad Crime : आयुर्वेदिक डॉक्टर, रुग्ण म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला फसवून शरीर संबंध अन्... रायगडमध्ये भयंकर घडलं

महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींना फसण्याचे प्रकार समोर येत आहेत. अलिबाग तालुक्यातील एका आय़ुर्वेद डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली एका रुग्ण तरुणीसोबत विनयभंग केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पेण तालुक्यातील ही घटना असून तरुणी मुंबईहून उपचारासाठी गेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकारात सतरा वर्षांची गर्भवती राहिली एवढंच नव्हे तर सतत शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पेण तालुक्यातील आदिवासी कुटुंबात हा सगळा प्रकार घडला आहे. पीडित तरुण 17 वर्षांची देखील नाही. शरीर आणि मानसिक परिपक्वता असल्यामुळे तिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याच भासवून हा प्रकार केला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आयुर्वेदिक डॉक्टर आणि तरुणी एकाच परिसरात राहत असल्यामुळे त्यांची ओळख होती. ज्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि हा प्रकार घडला. 

आरोपी डॉक्टरने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यासोबत मंदिरात लग्न केल्याचं भासवून घरी नेलं आणि शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला. लग्न झालं आहे आपलं काहीही चुकीचं नाही, असं भासवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत राहिला. नंतर ती मुलगी गर्भवती असल्याच समोर आलं आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. तसेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दबावामुळे मुलीवर खूप परिणाम झाला आहे. 

आरोपी डॉक्टरवर काय गुन्हे दाखल केले? 

भारतीय दंड संहिता कलम 64(2), (i), (m)POCSO अधिनियम 2012 चे कलम 4 आणि 6 (अल्पवयीन लैंगिक अत्याचार),बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9 POCSO कायद्यानुसार अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवणे हा कठोर दंडनीय गुन्हा असून, दोष सिद्ध झाल्यास आरोपीला दीर्घ मुदतीची शिक्षा होऊ शकते. वडखळ पोलीस अधिक तपास करत असून, पीडितेला वैद्यकीय उपचार व समुपदेशनाची मदत दिली जात आहे. समाजातील वाढत्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी पालक व प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More