शिवप्रेमींसाठी खुशखबर, रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला
ऐन दिवाळीत (Diwali) शिवप्रेमींसाठी खुशखबर आहे. रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला ( Raigad fort open to tourists) करण्यात आला आहे.
प्रफुल्ल पवार, अलिबाग : ऐन दिवाळीत (Diwali) शिवप्रेमींसाठी खुशखबर आहे. रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला ( Raigad fort open to tourists) करण्यात आला आहे. रायगडच्या (Raigad) जिल्हाधिकारी निधी चौधरी (Collector Nidhi Chaudhary) यांनी यासंदर्बात आदेश काढले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळं खुली करण्यात आली आहे. दरम्यान, इथे येणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग (Social distance) आणि मास्कचा (masks) वापर बंधनकारक असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील सर्व पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकच्या काळात रायगड (Raigad) पर्यटकांसाठी (tourists) खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे.
रायगड जिल्हयातील सर्व गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे तसेच स्मारके खुली करण्यात आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. मागील आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. ही ठिकाणे खुली करावीत अशी मागणी विविध संस्था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती.
महाड येथील मनोज खांबे यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने ही स्थळे खुली करण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता होत नव्हती, म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे रायगड किल्ल्याबरोबरच चवदार तळे व इतर गडकिल्ले या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
शिवाय त्यावर आधारीत रोजगार पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र हे करताना कोरोना काळात सोशल डिस्टन्सींग, मास्क वापरणे यासारख्या आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.