भाजप पुन्हा ठाकरेंना धक्का देणार? स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर?

Raigad Snehal Jagtap: रायगड जिल्ह्यात भाजप मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 23, 2025, 09:24 PM IST
भाजप पुन्हा ठाकरेंना धक्का देणार? स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर?
स्नेहल जगताप

Raigad Snehal Jagtap: रायगडमध्ये भाजप मोठी खेळी करणार आहे. कोकणात ताकद वाढवण्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंचा मोठा मोहरा फोडणार आहे. स्नेहल जगताप लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

रायगड जिल्ह्यात भाजप मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यासाठी महाडमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या स्नेहल जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे.जगतापांच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त देवेंद्र फडणवीस दावोसमधून परत आल्यानंतर ठरणार असल्याचंही कळतंय.. स्नेहल जगताप यांना भाजपमध्ये मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. 

स्नेहल जगताप काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या महाड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद त्यांनी सांभाळलं. शिवसेनेतील फुटीनंतर स्नेहल जगताप यांनी शिवसेना UBTत प्रवेश केला. भरत गोगावलेंनी शिवसेना सोडल्यानंतर महाडमध्ये स्नेहल जगतापांना नेतृत्वाची संधी देण्यात आलीय. भरत गोगावलेंविरोधात जगताप यांनी विधानसभा लढली, पण त्यांचा पराभव झाला. सभ्य, सुसंस्कृत संयमी अशी त्यांची ओळख आहे. 

स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश ठरला केवळ योग्य वेळेची वाट पाहिली जात असल्याचं सांगण्यात येत असलं तरी संजय राऊतांनी मात्र यावर बोलणं टाळलं. 2029 साली शतप्रतिशत भाजपचा नारा साकार करण्यासाठी भाजप कोकणात आपली ताकद आणखी वाढवतंय. त्यासाठी जगतापांचं पुनर्वसन करून त्यांचं नेतृत्व पुढे करण्यात येणार आहे.. तर दुसरीकडे महाडमधील भरत गोगावलेंनाही पर्यात म्हणून जगताप यांचं नेतृत्व पुढे केलं जात असल्याची चर्चा आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More