)
Thackeray Brother Alliance In Dassara : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडेल अशी अपेक्षा होती. पण, दसरा मेळव्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आलाय. 2 ऑक्टोबरला शिवतीर्थावर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय, दरम्यान या मेळाव्यात राज ठाकरे हजेरी लावणार असल्याची देखील चर्चा आहे. तसंच मेळाव्यातून युतीची घोषणा होणार का? याकडे देखील लक्ष लागले होते होते. प्रत्यक्षत मात्र. असे काहीच घडले नाही. राज ठाकरे कुठेच दिसले नाहीत. उद्धव ठाकरे भर पावसात एकटेच आले.
दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंची तोफ धडाली आहे.
यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंसाठी खास असणार अशी चर्चा होती. कारण पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हा दसरा मेळावा पार पडणार होता. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे हजेरी लावणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. इतकचं नाही तर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या या टीझरमधून शिंदेंच्या शिवसेनेला देखील डिवचण्यात आले होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीच दसरा मेळाव्याच्या स्टेजवर दिसले नाहीत,
मात्र, आता ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालंय. त्यामुळे दसरा मेळाव्यात हे दोन्ही अनेक दशकानंतर एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याकडे होते. येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींचं बिगुल वाजणारय. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार का? अशी चर्चा रंगली होती.
राज ठाकरे दसरा मेळाव्याला आलेच नाहीत. राज ठाकरे यांना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण नाही. त्यामुळे राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत. राज ठाकरे दसरा मेळाव्याला येण्याची सर्वांना उत्सुकता होती. पण राज ठाकरे या दसरा मेळव्यात सहभागी झाले नाहीत.
दरम्यान, जय राऊत यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थानाचा उल्लेख करत मोठे विधान केलं आहे. शिवाजी पार्क आपलं शिवतीर्थ आहे. याशिवाय आणखी एक शिवतीर्थ आहे, तेदेखील आपलंच मानलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
FAQ
1 शिवसेनेचा दसरा मेळावा कधी आणि कुठे झाला?
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चा दसरा मेळावा २ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आला. मेळाव्याची सुरुवात शस्त्रपूजन आणि सोनेवाटपाने झाली, आणि उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी भाषण केले.
2 दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित होते का?
नाही, राज ठाकरे दसरा मेळाव्यात उपस्थित राहिले नाहीत. त्यांना ठाकरे गटाकडून निमंत्रणच देण्यात आले नव्हते, ज्यामुळे ते हजेरी लावू शकले नाहीत. पूर्वीच्या चर्चा आणि अपेक्षांनुसार त्यांची उपस्थिती अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात ते दिसले नाहीत.
3. मेळाव्यात युतीची घोषणा झाली का?
मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. पूर्वी हिंदी सक्तीविरोधातील विजय मेळाव्यात दोघे एकत्र आले होते, आणि पालिका निवडणुकांसाठी युतीची चर्चा सुरू आहे, पण दसऱ्यात अशी घोषणा झाली नाही.