'वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी' राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांसमोर सर्वच काढलं;'...त्यानंतरच निवडणुका घ्या!'

Raj Thackeray On Election Commission: काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.   

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 14, 2025, 02:15 PM IST
'वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी' राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांसमोर सर्वच काढलं;'...त्यानंतरच निवडणुका घ्या!'
राज ठाकरे

Raj Thackeray On Election Commission:  निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक अधिका-यांची भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांचा शिष्टमंडळात सहभाग आहे...विशेष म्हणजे मविआ नेत्यांसोबत राज ठाकरेही सहभागी झाले. दरम्यान राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले आहेत. काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.   

Add Zee News as a Preferred Source

सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनाही निमंत्रण दिलं होते. लोकशाही बळकट व्हावी, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हा भेटीचा मुख्य उद्देश असल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलंय. दरम्यान निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरे बंधूंची युतीची चर्चा, कालचा ठाण्यातील एकत्र मोर्चा आणि आज पुन्हा एकत्र निवडणूक अधिका-यांची भेट यामुळे राज ठाकरेंच्या मविआतील एन्ट्रीबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. 

दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव आहेत. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ?  असा प्रश्न राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे. जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? असा प्रश्न राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला. व्हिव्हिपॅट मशीन लावा. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले. 

FAQ

प्रश्न: शाळांमध्ये UPI पेमेंट लागू करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश काय आहे?

उत्तर: केंद्र सरकारचा उद्देश शालेय प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे आहे. UPI द्वारे शुल्क भरण्याची सुविधा लागू केल्याने पालकांना घरबसल्या एका क्लिकवर शुल्क भरता येईल, लांब रांगा टाळता येतील आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल. यामुळे शाळांचे कामकाज स्मार्ट होईल आणि डिजिटल इंडिया मोहिमेला चालना मिळेल.

प्रश्न: UPI पेमेंटमुळे पालकांना कसा फायदा होईल?

उत्तर: UPI मुळे पालकांना शुल्क भरण्यासाठी शाळेत जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. ते घरूनच मोबाइलद्वारे त्वरित आणि सुरक्षितपणे शुल्क भरू शकतील. यामुळे वेळेची बचत होईल, विशेषतः प्रवेश आणि परीक्षा काळात, आणि व्यवहारांचा डिजिटल रेकॉर्ड कायमस्वरूपी सुरक्षित राहील.

प्रश्न: UPI पेमेंट शाळांच्या व्यवस्थापनाला कसे सुधारेल?

उत्तर: UPI मुळे शुल्क भरण्याची प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक होईल. रोख रकमेच्या व्यवहारांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, जसे की पावती गहाळ होणे किंवा रकमेची चूक, टाळता येतील. यामुळे शाळांचे आर्थिक व्यवस्थापन अधिक आधुनिक आणि कार्यक्षम होईल, तसेच शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढेल.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More