Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यावर राज ठाकरे यांची खास मित्रासोबतची मैत्री कायमची तुटणार आहे. राज ठाकरेंच्या खास मित्राने तशी प्रतिक्रिया दिली आहे. कोण आहे हा राज ठाकरे यांचा खास मित्र जाणून घेऊया.
भाजप नेते आशिष शेलारांनी केलेल्या मोठ्या विधानाची. राज ठाकरे यांचे खास मित्र आशिष शेलार हेच आहेत. माझ्यासाठी वैयक्तिक मित्र विषय संपला असं म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आशिष शेलार आणि राज यांच्या मैत्रित दुरावा निर्माण होऊ शकतो.
आशिष शेलारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे शेलार आणि राज ठाकरे यांच्या मैत्रित दुरावा आला की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. . उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, 'युतीबाबत आता चर्चा नको अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. युतीबाबत मीडियाशी न बोलण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिल्यांचे समजते. राज ठाकरे परदेशातून मुंबईत आल्यानंतर या विषयावर जाहीरपणे बोलण्याची शक्यता आहे.
खासदार नरेश म्हस्केंचा शिवसेना UBTवर हल्लाबोल केला आहे. -मुंबई मनपासाठी राज ठाकरेंना साद घातली जात अशी टीका म्हस्के यांनी केली. उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन असल्याचा टोला त्यांनू लगावला. उद्धव ठाकरेंमुळेच राज यांना पक्ष सोडावा लागला. राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत असंही खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.