महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! दसरा मेळाव्याला गैरहजर असलेले राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले आणि...

उद्धव ठाकरे-राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. खासदार संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाला ठाकरे बंधूंनी हजेरी लावली. 

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2025, 04:18 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! दसरा मेळाव्याला गैरहजर असलेले राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले आणि...

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : दसरा मेळाव्याला ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणी होईल अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु होती. प्रत्यक्षात मात्र, राज ठाकरे शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला गैरहजर होते. दसरा मेळाव्यानंतर  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोडी घडताना दिसत आहेत. दसरा मेळाव्याला गैरहजर असलेले राज ठाकरे थेट मातोश्रीवर आले होते.  राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला मातोश्रीवर दाखल झाले. संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. राऊतांच्या नातवाच्या बारशात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसले. त्यानंतर राज ठाकरेंनी मातोश्री गाठली. तिथे सुमारे अर्धा तास थांबून, राज मातोश्रीवरुन शिवतीर्थच्या दिशेनं रवाना झाले. गेल्या 2 महिन्यांत दुस-यांदा राज ठाकरे मातोश्रीवर गेले. ही भेट कौंटुबिक भेट असल्याचे बोलले जाते. 

राज्याच्या राजकारणात ठाकरेंच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीबाबत राज्यातील जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आज पुन्हा उद्धव आणि राज ठाकरे एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. या वेळी निमित्त होतं संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाचं. या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. यावेळी दोन्ही कुटुंबात दिलखुलास गप्पाही झाल्याचं पाहायला मिळाले. 5 जुलैच्या मराठी विजयी मेळाव्यात एकत्र आल्यानंतर हे दोन्ही बंधूंमधील भेटीगाठी वाढतच गेल्या. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. नंतर गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंनी कृष्णकुंजवर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल. आता संजय राऊतांच्या नातवाच्या बारशात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More