ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस मराठीच्या मुद्द्यावरुन गाजला. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. या विषयावर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली विस्तृत भूमिका मांडली. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती कशाप्रकारे लादली जात आहे आणि त्यातून भविष्यात कशाप्रकारे मराठीजनांच्या अस्तित्वावर घाला घातला जाऊ शकतो,हे राज ठाकरेंनी सांगितले. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात सुरु असलेल्या मराठी-हिंदीच्या राजकारणाला त्यांनी अमराठी आयएएस अधिकाऱ्यांना जबाबदार धरलंय. 'माझ्याकडे त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजाव', असा इशाराच राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरेंच्या निशाण्यावर अमराठी आयएएस अधिकारी कसे काय आले? भविष्यात याचे काय परिणाम होऊ शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मराठीच्या मुद्द्यावरुन भल्याभल्यांना अंगावर घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता मराठीच्या मुद्द्यावरुनच थेट सरकारमधल्या अमराठी आयएएस आधिकाऱ्यांना टार्गेट केले आहे. मराठी बोलली जाऊ नये या उद्देशाने सरकारमध्यल्या या अमराठी अधिकारी मंडळींनीच हिंदी सक्तीची केल्याकडे बोट दाखवून राज यांनी पहिल्यांदाच अमराठी आयएएस ऑफिसरला निशाण्यावर ठेवले आहे. परिणामी, हिंदीच्या मुद्द्यावरुन मनसे विरुद्ध अमराठी आयएएस लॉबी असा नवा संघर्ष महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ शकतो.
मराठी माणसाची बाजू लावून धरताना राज यांनी आतापर्यंत देशभरातील बड्या राजकारण्यांना लक्ष्य केले. त्याचवेळी त्या त्या काळातल्या सत्त्ताधाऱ्यांनाही सुनावले. पण राज यांचा मोर्चा आता पहिल्यांदाच सरकारमधील प्रशासकीय बाजू संभाळणाऱ्या आयएएस ऑफिसरकडे सरकल्याचे दिसत आहे. हिंदीची सक्ती या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष प्रचंड आक्रमक झालाय. सत्ताधाऱ्यांसह शाळा व्यवस्थापनाला त्यांनी इशारा दिला.
हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यभर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. हिंदी सक्तीविरोधात मनसेच्या खळ्ळखट्याक आंदोलनाला सुरुवात झाली.मनसैनिकांनी हिंदी पुस्तकांचे पहिले आणि शेवटचे पान जाळून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केलाय. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हे आंदोलन केलं.राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्धच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे.बईतच नव्हे तर पुण्यात देखील हिंदी सक्तीविरोधात मनसेनं आंदोलन केलंय.मनसे कार्यकर्त्यांकडून बालभारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. हिंदी विषय शिकवण्याबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी मनसैनिकांकडून करण्यात आलाय.तर तिकडे भांडुपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हिंदीची पुस्तकं विक्रीसाठी आल्यास त्यांची विक्री करू नका असं आवाहन दुकानदारांना केलंय.त्यानंतरही हिंदींच्या पुस्तकाची विक्री झाल्यास ती सर्व पुस्तक जाळून टाकण्याचा इशारा मनसैनिकांकडून देण्यात आलाय.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.