घायवळचा बहाणा भाजपवर निशाणा, धंगेकरांची पुन्हा चंद्रकांतदादांवर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतरही धंगेकरांनी चंद्रकांतदादांवर टीका केलीय. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी आपण ही भूमिका मांडल्याचा दावा धंगेकर करतायेत.

पूजा पवार | Updated: Oct 13, 2025, 09:23 PM IST
घायवळचा बहाणा भाजपवर निशाणा, धंगेकरांची पुन्हा चंद्रकांतदादांवर टीका
(Photo Credit : Social Media)

निलेश खरमरे (प्रतिनिधी) पुणे : लंडनला पळून गेलेल्या निलेश घायवळच्या गुंडगिरीच्या निमित्तानं शिवसेना नेते रवींद्र धंगेकर विरुद्ध चंद्रकांतदादा पाटील असा सामना सुरु झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतरही धंगेकरांनी चंद्रकांतदादांवर टीका केलीय. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी आपण ही भूमिका मांडल्याचा दावा धंगेकर करतायेत.

Add Zee News as a Preferred Source

कोथरुडचा गुंड निलेश घायवळच्या प्रकरणात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांतदादांविरोधात आघाडी उघडलीये. निलेश घायवळ आणि त्याच्यासोबतच्या गुंडांचा भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांभोवती वावर का आहे असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केलाय. निलेश घायवळ लंडनला पळून गेल्यापासून धंगेकर सातत्यानं चंद्रकांतदादांना प्रश्न विचारतायेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्यानंतरही धंगेकर आजही आपल्या मुद्यावर ठाम आहेत.

धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर भाजपही आक्रमक झालीये. धंगेकरांना वेसण घालण्याची गरज असल्याचं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलयं. तर दरेकरांच्या आरोपांना धंगेकरांनीही सडेतोड उत्तर दिलंय.

रवींद्र धंगेकरांनी कोथरुडच्या गुन्हेगारांविरोधात मोहीम उघडलीये. या मोहिमेमुळं त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. धंगेकरांनीही आपल्यावर वेगवेगळ्या माध्यमातून हल्ले केले जात असल्याचा आरोप केलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनीही धंगेकरांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केलीय.

खरं तर पुणे गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी मोहीम उघडल्याचं रवींद्र धंगेकर सांगतायत. असं असलं तरी धंगेकरांचा आक्रमक बाणा पाहता त्यांच्या रडारवर चंद्रकांतदादा पाटील आहेत हे लक्षात येत असल्याचं पुण्यातील राजकीय निरीक्षक सांगू लागलेत.

FAQ : 

निलेश घायवळ प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर काय आरोप केले?
उत्तर: कोथरुडचा गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या गुंडांच्या भाजप नेते व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांभोवती वावर का आहे, असा थेट सवाल धंगेकरांनी उपस्थित केला. घायवळ लंडनला पळून गेल्यापासून धंगेकर सातत्याने पाटलांवर टीका करत आहेत.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना काय सूचना दिली आणि त्यांचा प्रतिसाद काय?
उत्तर: शिंदेंनी धंगेकरांना समज दिल्यानंतरही धंगेकर आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. ते पुणेकरांच्या सुरक्षेसाठी ही भूमिका घेत असल्याचा दावा करत आहेत आणि चंद्रकांतदादांवर टीका थांबवली नाही.प्रश्न ३: भाजपने 

धंगेकरांच्या आरोपांना काय उत्तर दिले?
उत्तर: भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी धंगेकरांना वेसण घालण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं. यावर धंगेकरांनी सडेतोड उत्तर देत आपली मोहीम गुन्हेगारीविरोधात असल्याचं सांगितलं.

About the Author