Jio Coin: कमी वेळात जास्त नफा मिळवून देण्यासाठी जगभरातील गुंतवणूकदार क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक खूपच जोखमीची असते. क्रिप्टोतील गुंतवणूक भारतात कायदेशीर नाही. असे असले तरी अनेक भारतीयांना याबद्दल उत्सुकता असते. अनेकजण याबद्दल संशोधन करताना दिसतात. आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ प्लॅटफॉर्म क्रिप्टोमध्ये एन्ट्री करणार का? अशा चर्चा वेगाने पसरु लागल्या आहेत.
जिओने अलीकडेच इंटरनेट तंत्रज्ञान कंपनी पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारीची घोषणा केली. अंबानींच्या टेलिकॉम कंपनीने हे जाहीर केल्यापासून JioCoin ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. जिओ कॉइनचे यूजर्स त्याचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. अनेक यूजर्स ट्विटरवर JioCoin चे फोटो शेअर, रिट्वीट करताना दिसतायत. असे असले तरी जिओ कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. बिटनिंगचे सीईओ काशिफ रझा यांनीही यासंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. जिओकॉइनचा वापर मोबाईल रिचार्ज किंवा रिलायन्स गॅस स्टेशनवर खरेदीसारख्या सेवांसाठी केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जातोय.
जिओने पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारी केल्यानंतर बाजारात विविध चर्चा सुरु झाल्या. ब्लॉकचेन आणि वेब 3 क्षमतांसह त्यांच्या ऑफरिंग्ज वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. असे असले तरी अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओकडून जिओ कॉइन किंवा त्याच्या वापराबद्दल कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीजची तंत्रज्ञान उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सने अलीकडेच भारतात वेब३ आणि ब्लॉकचेन क्षेत्रात एन्ट्रीसाठी पॉलीगॉन प्रोटोकॉलची डेव्हलपर शाखा असलेल्या पॉलीगॉन लॅब्ससोबत भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे आता जिओ यूजर्सेना नवीन, नाविन्यपूर्ण आणि संभाव्य फायदेशीर सेवा मिळू शकतो. याद्वारे जिओ यूजर्सना वाढीव गोपनीयता आणि वैयक्तिक डेटावरील नियंत्रण यासारखे फायदे मिळू शकतात.
जिओ प्लॅटफॉर्मच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या काही विद्यमान सेवांमध्ये वेब३ क्षमता जोडणे, पॉलीगॉनच्या अत्याधुनिक ब्लॉकचेन सोल्यूशन्सचा वापर करून जिओच्या विद्यमान 450+ दशलक्ष ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण वेब३ सेवा तयार करणे हादेखील यामागचा हेतू आहे. ब्लॉकचेन, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिजिटल मालमत्ता आणि टोकन्स, ज्यात क्रिप्टोकरन्सी, सेंट्रल बँक डिजिटल चलने (CBDCs) आणि NFTs यांचा समावेश आहे, यासारख्या नवीन तंत्रज्ञानात Web3 चा सपोर्ट मिळतो.
पॉलीगॉन लॅब्स ही एक सुप्रसिद्ध क्रिप्टो आणि ब्लॉकचेन प्लेअर आहे आणि ही भागीदारी जिओला क्रिप्टो उद्योगात प्रवेश करण्यास सक्षम करू शकते. त्यामुळे मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कंपनीसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण आहे. पॉलीगॉन लॅब्ससोबतचा संबंध हा जिओच्या डिजिटल उत्कृष्टतेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला Web3 च्या अमर्याद शक्यतांचा शोध घेण्यास आणि आमच्या युजर्सना अद्भूत डिजिटल अनुभव देण्यास आम्ही उत्सूक आहोत, अशी प्रतिक्रिया जेपीएलचे सीईओ किरण थॉमस यांनी यावेळी दिली.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
IND
(20 ov) 193/6
|
VS |
NED
176/7(20 ov)
|
| India beat Netherlands by 17 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 199/3
|
VS |
NAM
97(17.3 ov)
|
| Pakistan beat Namibia by 102 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 122/6
|
VS |
SA
123/4(13.2 ov)
|
| South Africa beat United Arab Emirates by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.