Religious Tourism: सध्या जगभरात टूरीजम क्षेत्र झपाट्याने भरारी घेत आहे. टूरीजमचे अनेक ट्रेंड येत आहेत. अशातच भारतात धार्मिक पर्यटन अर्थात Religious Tourism तेजीत आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय धर्म छोट्या मोठ्या तसेच अनेक स्टार्टअप कंपन्यांसाठी सर्वात मोठा इन्मक सोर्स ठरत आहे. Religious Tourismच्या माध्यमातून कंपन्यांना 17 लाख कोटी कमावण्याची संधी आहे. OYO च्या संस्थापकाने हा दावा केला आहे. जाणून घेऊया कोणता आहे धर्म ज्यामुळे सर्वांनाच कमाईची संधी मिळत आहे.
भारतात धार्मिक पर्यटनाची व्याप्ती खूप मोठी आहे. मागील 4 वर्षात कंपन्यांना भरपूर महसूल मिळाला आहे. धार्मिक पर्यटनातुन पैसे कमविण्यास भरपूर वाव आहे, ज्याकडे हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना लक्ष द्यावे लागेल ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल असं म्हणाले. मुंबईतील इंडस एंटरप्रेन्योर्स समिटमध्ये ते बोलत होते.
देशात राम मंदिराच्या उभारणीनंतर आणि कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांनंतर देशात धार्मिक पर्यटन वेगाने वाढत आहे. हिंदू धर्मातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत.
प्रयागराजमधील कुंभमेळ्यादरम्यान 5 लाखांहून अधिक लोक ओयो हॉटेलमध्ये राहिले होते. आमच्या उत्पन्नापैकी सुमारे 20 टक्के रक्कम धार्मिक स्थळांमधून येते. बनारस आणि तिरुपती ही ओयोला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारी ठिकाणे आहेत. दररोज लाखो लोक तिरुपतीला भेट देतात. सुट्टीच्या दिवसात ही संख्या आणखी वाढते.
यावर भर दिला पाहिजे आणि या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. धार्मिक पर्यटनातून पुढील 3 ते 4 वर्षांत 150ते 200 अब्ज डॉलर्स म्हणेच सुमारे 17 लाख कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.
कन्याकुमारी आणि सोमनाथ सारख्या उदयोन्मुख केंद्रांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पूर्वी येथे येणाऱ्या पर्यटकांना आश्रमशाळेत राहण्याशिवाय पर्याच नव्हता. आता मात्र, येथे नवीन हॉटेल्स बांधली जात आहेत. आता लोकांकडे अधिक पर्याय आहेत अशा प्रकारे भारतातील हिंदू धार्मिक स्थळांवर सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. येथे नवे हॉटेल्स उभारल्यास कोट्यावधीची कमाई करण्याची संधी आहे.