Bharat Jain World's richest beggar lives in Mumbai : भिकारी पाहिला की आपल्याला दया येते. लगेच आपण दहा वीस रूपये त्याच्या हातावर टेकवतो आणि पुढे होतो.. पण आता असं करण्यापूर्वी विचार करा.. नाहीतर तुमची फसगत होऊ शकते... कारण अनेकांचा मासिक पगारही नसेल इतके पैसे एक भिकारी महिन्याला भीक मागून कमावतो. आपल्या महाराष्ट्रात आहे भारतातीलच नाही संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत भिकारी जाणून घेऊया या भिकाऱ्याविषयी.
ये है मुंबई मेरी जान.... या मायानगरी मुंबईत अनेक श्रीमंत लोक राहतात. अनेक गरीबांनीही इथे आसरा घेतला आहे. प्रत्येक जण इथे आपलं नशीब आजमावतो. कुणाला यश मिळतं तर कुणाच्या पदरी निराशा पडते. याच मायानगरीत भीक मागून एक भिकारी करोडपती झाला आहे. अनेकांचा पगारही नसेल इतके पैसे तो महिन्याला कमावतो. या भिका-याचं नाव आहे भरत जैन.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान या भागात रोज 12 तास भीक मागायची असा त्याचा दिनक्रम. त्यातूनच त्यानं सुमारे साडे सात कोटी रूपये कमावलेत. भरत जैन हा जगातला सर्वात श्रीमंत भिकारी आहे
भरत जैनकडे चक्क 7.5 कोटींची संपत्ती आहे. त्याच्याकडे मुंबईत दीड कोटींचे दोन फ्लॅट आहेत. ठाण्यात दोन दुकानं आहेत. दुकानांच्या भाड्यातून प्रतिमहा 30 हजार रूपये मिळतात. रोज 12 तास भीक मागून अडीच हजारांची कमाई. महिन्याकाठी हा भिकारी सुमारे 75 हजार रूपयांची कमाई करतो.
भरत जैन हा पत्नी, दोन मुलं, वडील आणि भावासोबत राहतो. त्याची मुलं नामांकित कॉन्व्हेंट स्कूलमधून शिकली. त्याची मुलं स्टेशनरी स्टोअर सांभाळतात.
आता भरतची परिस्थिती सुधारलीय. त्यामुळे घरच्यांनी वारंवार भीक मागू नको, असं सांगितलं. पण भीक मागण्यावर भरत ठाम आहे. भरत 40 वर्षांहून अधिक काळ भीक मागतोय. त्यांचं आर्थिक यशही त्याने केलेल्या शहाणपणामुळेच मिळालंय..