)
Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमधील अट हटवण्यासाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत होते. आज रविवारी रात्री उशिरा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने रोहित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे. जेव्हा गिरीश महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण सोडलं.
22 तारखेपूर्वी रोहित पवार यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांने आमंत्रण देण्यात आलंय. अराजकीय आंदोलन असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही म्हणून सरकार बरोबर चर्चेसाठी जाऊ अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. सरकारची चर्चा करून मागण्या मान्य करून घेवू, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
गिरीश महाजन भेटायला आले होते तेव्हा रोहित पवार म्हणाले की, 22 तारखेला अधिवेशन असल्याने त्यापूर्वी सरकार बैठक घेणार आहे. तर 30 जूनपासून कर्जमाफी लागू होणार आहे. जे बदल आहे, ते 30 जूनच्या पूर्वी झाली पाहिजे. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आपल्याकडे थोडा वेळ आहे. आपण चर्चेला मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे का?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. तसंच मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत कोण येणार हेही त्यांनी सांगितलं आहे. रोहित पवार म्हणाले की, बैठकीला राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर, रविकांत तुपकर, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेतेही असणार आहेत. सर्व शेतकरी नेते आहेत. चर्चा करू आपण मागण्या पूर्ण करूयात.
पुढे रोहित पवार म्हणाले की, ‘दोनच छोट्या अटी असून सरकार त्या ठेवणार नाही. पण त्यात गडबड झाली तर 4 जुलै रोजी मराठवाड्यात आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. बैठक ठरली असून मागण्यासमोर आहे. उगाच राजकारण आणून उपोषण लांबवून शेतकऱ्यांचं नुकसान करायचं नाही. रविकांत तुपकर उद्यापासून उपोषण सोडणार आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तीन दिवस न लावता. उद्या किंवा परवाच त्यांना भेटावं, असंही त्यांनी यावेळी गिरीश महाजन यांना सांगितलं.
रोहित पवार यांना भेटण्यासाठी आले असताना गिरीश महाजन म्हणाले की, ‘राज्य सरकार सकारात्मक असून मोदी असतील किंवा फडणवीस असतील सर्व सकारात्मक आहे. वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी लागते. तर शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देत असतो. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही आपण सोडवत आहोत. रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत बैठक बोलावली आहे. चर्चेतून तोडगा निघेल. मी रोहित पवार यांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं.