)
Mohan Bhagwat Speech at Nagpur : देशभरात दसऱ्याचा उत्साह दिसून येत आहे. नागपुरातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करुन दसरा साजरा केला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भारतीय आणि परदेशी मान्यवर उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर आपला 100 वा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर टीका केली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर बोलताना भागवत म्हणाले की, अमेरिकेने लागू केलेलं नवीन टॅरिफ धोरण त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. पण ते सर्वांना प्रभावित करते. जग परस्परावलंबनावर चालते; कोणत्याही दोन देशांमधील संबंध अशा प्रकारे राखले जातात. कोणताही देश वेगळा राहू शकत नाही. हे अवलंबित्व सक्तीमध्ये बदलू नये, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर त्यांनी यावेळी स्वदेशीवर भर देण्याचे आवाहन केलं.
ते पुढे म्हणाले की, आपल्याला स्वदेशीवर अवलंबून राहावे लागेल आणि स्वावलंबनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तरीही आपल्या सर्व मैत्रीपूर्ण देशांशी राजनैतिक संबंध राखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जे स्वेच्छेने आणि कोणत्याही सक्तीशिवाय केलं. जागतिक चिंतांवर उपायांसाठी जग भारताकडे पाहवं लागणार आहे. भारताने उदाहरण देऊन नेतृत्व करावे आणि जगाला मार्ग दाखवावा अशी विश्वाची इच्छा आहे, असं ते म्हणाले आहे.
तर त्यांनी पुढे पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर सरकार आणि सशस्त्र दलांनी दिलेल्या प्रतिसादाचे भागवत यांनी कौतुक केलं. दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्यांच्या निर्णायकपणा आणि एकतेचे कौतुक करताना भागवत म्हणाले की, या घटनेने जागतिक स्तरावर देशाचे खरं मित्र उघड झाले आहेत. ते म्हणाले, या दहशतवादी हल्ल्याबद्दल देश दुःखात आणि संतापात होता. पूर्ण तयारीसह, आपल्या सरकारने आणि सशस्त्र दलांनी योग्य उत्तर दिले. सरकारचे समर्पण, सशस्त्र दलांचे शौर्य आणि समाजातील एकता यामुळे देशात एक आदर्श वातावरण निर्माण झाले. पण या घटनेने हे स्पष्ट झाले की काही शक्ती भारताची एकता आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आता अधिक सतर्क राहिले पाहिजे."
मोहन भागवत यांच्या या विधानाने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका प्रतिबिंबित केली. भागवत म्हणाले, 'या घटनेने आपले मित्र आणि शत्रू उघड केले. याचा अर्थ असा की भारताने जागतिक स्तरावर हे समजून घेतले पाहिजे की कोणते देश आणि शक्ती खरोखर आपल्या हिताचे आहेत आणि कोणते आपल्याविरुद्ध कट रचत आहेत. शेजारील देशांमधील अस्थिरता आणि हिंसक हालचालींचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की भारताने आपल्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे.'