संघाने टोचले कान! नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावर घेतली भूमिका

औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा प्रासंगिक नसल्याचं विधान सुनिल आंबेकर यांनी केलंय. दरम्यान आरएसएसच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी देखील त्यांचं कौतुक केलंय. 

पुजा पवार | Updated: Mar 19, 2025, 09:38 PM IST
संघाने टोचले कान! नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावर घेतली भूमिका
(Photo Credit : Social Media)

मुंबई : नागपुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर आरएसएसनं आपली भूमिका जाहीर केलीय. औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा प्रासंगिक नसल्याचं विधान सुनिल आंबेकर यांनी केलंय. दरम्यान आरएसएसच्या या भूमिकेनंतर विरोधकांनी देखील त्यांचं कौतुक केलंय. 

औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन नागपुरात हिंसाचाराची घटना घडली. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली होती. दरम्यान यानंतर दोन गटात वाद झाल्यानं नागपुरात हिंसाचार उसळला होता. दरम्यान कोणत्याही प्रकाराचा हिंसाचार हा समाजासाठी योग्य नसल्याचं आरएसएसच्या सुनिल आंबेकरांनी म्हटलंय. तसंच औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा प्रासंगिक नसल्याचं विधान देखील त्यांनी केलंय.

हेही वाचा : नागपूर हिंसाचाराच्या मास्टरमाईंडला अटक; जमावाला भडकवल्याचा आरोप

 

सुनिल आंबेकरांच्या वक्तव्याला भाजप आमदार परिणय फुकेंनी देखील दुजारो दिलाय. औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा चुकीच्या वळणावर जात होता. तेच रोखण्याचं काम आरएसएसनं केल्याचं परिणय फुकेंनी म्हटलंय. आरएसएसनं घेतलेल्या भूमिकेनंतर शरद पवारांचया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आरएसएसचं कौतुक केलंय. तर संघाला उशिरानं शहाणपण सूचल्याचं म्हणत नाना पटोलेंनी टोला लगावला आहे. नागपुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर आरएसएसनं आपली भूमिका जाहीर केलीय. दरम्यान त्यांच्या या भूमिकेचं विरोधकांनी देखील कौतुक केलंय.