Ait Pawar NCP : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. अशातच भारताच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. केरळमधील एक मोठा राजकीय पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात विलीन झाला आहे. केरळ विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ही मोठी घडामोड मानली जात आहे.
केरळ विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं केरळ मध्ये मोठं पाऊल उचलले आहे. केरळचा समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात विलीन झाला आहे. कोट्टायम इथं माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुबोध मोहिते पाटील यांच्या उपस्थित विलीनीकरणचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्य सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष आणि आघाडीच्या संघटनांचे अध्यक्ष यांच्यासह आमचे राज्य नेते उपस्थित होते. सपाचे राज्य नेते, जिल्हा अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि केरळ मधील 7 जिल्ह्यांचे अध्यक्ष या विलीनीकरण कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केली आहे. 40 स्टार प्रचारकांची यादीत छगन भुजबळचे नाव नाही. रुपाली ठोबरे पाटील यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही. धनंजय मुंडे, नबाब मलिक, सना मलिक, रुपाली चाकणकर, सुरज चव्हाण यांना स्थान देण्यात आले. अमोल मिटकरी यांना प्रवक्ता पदावरून हटविल्यानंतरही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.