Samana On Eknath Shinde: राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सारेकाही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेनेत एकमेकांचे नेते,कार्यकर्ते घेण्याची रस्सीखेच सुरु आहे. रविंद्र चव्हाण आक्रमक भूमिकेत दिसतायत. या पार्श्वभूमी शिवसेना यूबीटी पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आलीय.
शिंदे गटाला वाटतं की मोदी-शाह सत्तेत असल्यामुळे त्यांचा कोणी केसही वाकडा करणार नाही. पण भाजप आणि मोदी-शाह कोणाचेच नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी मोदी-शाहांना प्रचंड मदत केली, तरी भाजप त्यांचे झाले नाही. मग शिंदे कोण लागले? कोकणात शिंदेंचे आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. भाजपचे लोक शिंदेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. शिंदे फक्त "युतीचा धर्म पाळा" म्हणून हतबलपणे बोलत आहेत. दोन नंबरच्या लोकांची बडबड कुणी गांभीर्याने घेत नाही, असे अग्रलेखात म्हटलंय.
महाराष्ट्रात महायुती ही तीन पायांची राजकीय व्यवस्था आहे. आधी महाविकास आघाडी सरकारला 'तीन चाकी रिक्षा' म्हणून टीका करणाऱ्यांच्या नशिबी असंच सरकार आलंय. ही रिक्षा भरकटली आहे आणि कधीही खड्ड्यात पडू शकते. नगरपालिका निवडणुकांमुळे युतीतच हाणामाऱ्या आणि कुरघोड्या सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रोज शिंदेंना टोमणे मारतात. शिंदे सत्ता आणि ED सारख्या भीतीमुळे चुप बसले आहेत, असेही सामनातून म्हटलंय.
चव्हाण म्हणतात, "दोन नंबर असं काही नसतं, त्याला किंमत नाही. देवाभाऊ (फडणवीस) सबकुछ!" 2 डिसेंबरनंतर युतीचा निकाल लागेल. शिंदे आणि फडणवीस गप्प आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातच स्पर्धा आहे. राज्यात अनेक समस्या असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त या निवडणुकांसाठी रान उठवत आहेत. 5-6 हेलिकॉप्टर आणि खासगी विमानांचा प्रचारासाठी वापर होतोय – हे पहिल्यांदाच, अशी टीका करण्यात आलीय.
निवडणुकांत सत्ता आणि पैशाचा खेळ सुरू आहे. मतदारांना १०-१५ हजार रुपये देऊन खरेदी केली जातेय. जो जास्त पैसा देईल, त्याच्या पक्षाचा दुपट्टा गळ्यात अडकवून 'झिंदाबाद' म्हणतात. शिंदे गटाच्या 'गुलाबो गँग'चा नेता म्हणतो, "आमच्याकडे नगरविकास खाते आहे, पैसाच पैसा आहे. १ तारखेला मतदारांना लक्ष्मीदर्शन होईल." पण या पैशांमुळे जनतेचं भविष्य आणि महाराष्ट्राची इभ्रत विकली जातेय. फडणवीस म्हणतात, "आमच्याकडे नीती, नियती आणि निधी भरपूर आहे." सत्तेचे विकेंद्रीकरण संपतंय, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आलीय.
नगरपालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरेच काही घडेल. चव्हाणांनी शिंदेंवर 'सुपारी' कातरायला घेतली आहे. शिंदे गटाची फडणवीस-चव्हाणांनी कोंडी केल्याचे आरोप सामनातून करण्यता आलीय. शिंदे अमित शहांचे राजकीय आश्रित आहेत, त्यांच्याकडे स्वाभिमान किंवा संघर्ष करण्याचं बळ नाही. ते फेकलेल्या तुकड्यांवर जगतात, अशा भाषेतही टीका करण्यात आलीय. शिंदे गटाचे शहाजी पाटील म्हणतात, "आमच्या नशिबी भाजपची गुलामीच आहे." पुढे भाजप शिंदे गटाचे किमान 35 आमदार गिळून ढेकर देईल. शिंदे गटाचा निर्माता भाजपच आहे, आणि आता ते त्यांचेच शत्रू असल्याचे सामनातून म्हटलंय.
उत्तर: कारण २०२२ मध्ये शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेला (एक नंबर) पाठीत खंजीर खुपसून भाजपबरोबर सत्ता घेतली, म्हणून त्यांना “दोन नंबर” म्हणतात. अग्रलेख म्हणतो, “दोन नंबरला खरेच काहीच किंमत नसते.” भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर जाहीर म्हणतात, “दोन नंबर असं काही नसतं, देवाभाऊ (फडणवीस) सबकुछ!” म्हणजे शिंदे गटाची भाजपला गरज संपली की त्यांना बाजूला केलं जाईल.
उत्तर: महायुती ही भाजप-शिंदे सेना-अजित पवार गट अशी तीन पक्षांची सत्ता आहे. आधी भाजप महाविकास आघाडीला “तीन चाकी रिक्षा” म्हणून चिडवायचा. आता त्यांच्याच नशिबी असंच सरकार आलंय. अग्रलेख म्हणतो, ही रिक्षा आता भरकटली आहे, नगरपालिका निवडणुकांमुळे आतूनच हाणामाऱ्या सुरू आहेत आणि कधीही खड्ड्यात पडू शकते.
उत्तर: अग्रलेखाचा दावा आहे की, या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात खूप काही घडेल. भाजपने शिंदे गटाची पुरती कोंडी केली आहे. रवींद्र चव्हाणांनी तर “सुपारी” घेतली आहे. शिंदे गट हा भाजपने तयार केलेला आहे, पण आता भाजप त्यांचे किमान ३५ आमदार गिळून टाकेल आणि ढेकर देईल. शिंदे गटाचे शहाजी पाटील म्हणतात, “आमच्या नशिबी भाजपची गुलामीच आली आहे.” म्हणजे शिंदे गटाला मोदी-शाह आपले वाटतात हा फक्त भ्रम आहे, भाजप कोणाचाच नाही!
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.