मंत्र्यांना चिखलात बुडवून बाहेर काढल्यावर ओला दुष्काळ जाहीर करणार का?

उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

Updated: Oct 23, 2022, 05:31 PM IST
मंत्र्यांना चिखलात बुडवून बाहेर काढल्यावर ओला दुष्काळ जाहीर करणार का? title=
(फोटो सौजन्य - @ShivSena)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संभाजीनगरमध्ये (sambhaji nagar) गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या अतिवृष्टीमुळे (heavy rain) नुकसानग्रस्त झालेल्या गावांना भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी देखील केली. उद्धव ठाकरे यांना सरकारने ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करावा अन्यथा शिवसेना (Shivsena) रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. हे सरकार बेदरकार आहे, ओला दुष्काळ जाहीर करणार नाही मात्र किमान तात्काळ मदत कशी देता येईल याचा तरी विचार करावा असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. ओला दुष्काळाच्या (wet drought) निकषावरुन उद्धव ठाकरे भाष्य केले. मंत्र्यांना चिखलात बुडवून बाहेर काढल्यावर ओला दुष्काळ जाहीर होईल का? असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला

"आजची भेट प्रतिकात्मक आहे. इथे विचित्र अवस्था आहे. दिवाळी सुरुय आणि इकडे शेतकऱ्याचं दिवाळ निघालं आहे. मी विरोधी पक्षात आहे म्हणून नाही तर बळीराजाचे माझ्यावर ऋण आहेत म्हणून मी आलो आहे. लॉकडाउन मध्ये अर्थ व्यवस्थेला बळीराजाने आधार दिला.  पुण्यात रस्ते तुंबले त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही आताही असेच काही म्हणतील. बळीराजा ऊघड्यावर पडू नये ही सरकारची जबाबदारी आहे.
मात्र या निर्दयी सरकारकडे भावनांचा अभाव आहे," असे उद्धध ठाकरे म्हणाले.

हे उत्सवी सरकार आहे, फक्त उत्सव साजरे करत आहे आणि लोक सेवेत अपयशी ठरतयं. बेदरकारपणे सांगताय ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, म्हणून मी पाहायला आलो. आता खर काय आणि खोटं काय डोळ्यांनी पाहता येईल. पंचनामे करे पर्यंत शेतकऱ्यांचे आयुष्य खराब होतंय. ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता, मात्र भावनेचा अभाव असल्याने सरकार जाहीर करणार नाही. मात्र सरकारने मदत तरी तात्काळ जाहीर करावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.