अर्रsss भिर्रssss! हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल बैलजोडीनं मारलं देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं मैदान, बक्षिसात फॉर्च्युनर कार अन्...

Sangli News Bailgada Sharyat in india video : बैलगाडा शर्यतीत विजेत्यांवर बक्षिसांची खैरात... फॉर्च्युनर कार, ट्रॅक्टर अन्... हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल बैलजोडीची दमदार कामगिरी पाहून शर्यतीच्या मैदानात जल्लोषाचं वातावरण... पाहा थरारक दृश्य...    

सायली पाटील | Updated: Nov 10, 2025, 08:55 AM IST
अर्रsss भिर्रssss! हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल बैलजोडीनं मारलं देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं मैदान, बक्षिसात फॉर्च्युनर कार अन्...
Sangli news Chandrahar Patil biggest Bailgada Sharyat in india video fortuner car tractor winning prizes

Sangli News Bailgada Sharyat in india video : ‘डबल महाराष्ट्र केसरी' म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचीच चर्चा सर्वदूर पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब ते अगदी फेसबुकपर्यंत सर्वत्र याच बैलगाडा शर्यतीचे व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळत आहेत. नुकताच या शर्यतीचा जबरदस्त थरार पार पडला असून, प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदाचं मानकरी ठरलेल्या बैलजोडीचं नाव आहे हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल. या बैलजोडीने शर्यतीचं मैदान मारताच त्यांच्या दमदार कामगिरीनं आणि रुबाबानं शर्यतीच्या मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. 

Add Zee News as a Preferred Source

श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे हेलिकॉप्टर बैज्या - ब्रेकफेल या शर्यतीचे मानकरी ठरले आणि सर्वत्र उत्साहाचच वातावरण पाहायला मिळालं. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैज्या आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेक फेल बैलजोडीनं सर्वात मोठ्या आणि बहुचर्चित अशा शर्यतीत प्रथम पारितोषिकाच्या स्वरुपात फॉर्च्युनर गाडी पटकावली.

नुकतंच ‘शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन' पार पडलं आणि चर्चा झाली ती म्हणजे या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेमध्ये विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाखोंच्या बक्षिसांची. जिथं विजेत्यांना थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर आणि 150 टूव्हीलर अशी बक्षीसं ठेवण्यात आली होती. आश्चर्य म्हणजे या स्पर्धेदरम्यानच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या वर्षासाठीच्या बक्षिसांचीसुद्धा घोषणासुद्धा केली. 

चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही बैलगाडा शर्यत सांगलीच्या बोरगाव येथील कोड्याचा माळ इथं असणाऱ्या 500 एकर मैदानावर पार पडली. जिथं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान, चंद्रहार पाटील यांनी या शर्यतीदरम्यानच पुढच्या वर्षीच्या बक्षिसाचीसुद्धा घोषणा केली, जिथं पुढच्या वर्षी शर्यतीतील विजेत्यांना थेट BMW कार दिली जाणार असल्याचं जाहीर केल्यानं बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आतापासूनच उत्साही वातावरण पाहायला मिळत असून, या शर्यतीत पुढच्या वर्षी सहभागी व्हायचं म्हणून अनेकांनी तयारीसुद्धा सुरू केली आहे. 

FAQ

सांगलीतील बैलगाडा शर्यत म्हणजे काय आणि तिची चर्चा का आहे?
ही देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आहे, जी 'डबल महाराष्ट्र केसरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुकवर याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. 

या शर्यतीचे विजेते कोण आहेत आणि त्यांची बैलजोडी कशी आहे?
प्रथम क्रमांक पटकावणारी बैलजोडी हे हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल आहेत. हेलिकॉप्टर बैज्या कोल्हापूरच्या शिरोळ येथील बाळू दादा हजारे यांचा आहे, तर ब्रेक फेल सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा आहे. 

शर्यतीचे नाव काय आणि विजेत्यांना काय बक्षिसे मिळाली?
ही शर्यत 'श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत' म्हणून ओळखली जाते. विजेत्यांना फॉर्च्युनर गाडी, थार, ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी वाहने अशी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More