पुणे : बुधवारी पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान संजय राऊत यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमचा निर्णय निवडणुकीआधीच झाला होता तसंच मी दाऊद इब्राहिमला पाहिलंय आणि दमही दिलाय, असे अनेक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलेत. इतकंच नाही तर धनंजय मुंडे महाविकास आघाडीत कसे आले हे सांगताना, निकालानंतर अजित दादांसोबत गेलेल्या धनंजय मुंडेंशी बोलणं झालं नसतानाच ते परत येत आहेत, असं ठामपणे सांगितल्याचाही गौप्यस्पोट संजय राऊत यांनी केलाय.
आमचा निर्णय निवडणुकीआधीच झाला होता
...ते शब्द पाळणार नाहीत, याची खात्री होती - संजय राऊत
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची खात्री नव्हती. भाजपच्या सोयीनं निकाल लागले - संजय राऊत
हे सरकार टेस्ट ट्युब बेबी नाही - राऊत
शरद पवार यांच्या शब्दावर माझा मोठा विश्वास.... सरकारच्या पाठिशी शरद पवार ठाम
आम्हाला राज्य चालवण्याचा उत्तम अनुभव
आम्ही करायचं ठरवलंय आणि आम्ही हे सरकार चालवणार
सरकार बनवताना काय डलं हे गुपित राहू द्या, हा एक सिनेमा आहे
आम्ही एक उत्तम कलाकृती निर्माण केली. तुम्ही त्याला नाट्य म्हणा, सिनेमा किंवा आणखी काही म्हणा...
महाराष्ट्रात सगळ्यांच्या सुदैवाने मजबूत विरोधी पक्ष आहे. त्यांनी विरोधासाठी विरोध करू नये... थोडे दिवस काम करू द्या, नंतर बघू
सरकार काम करतं, थोड्या चुकाही होतात
अजित दादांसोबत गेलेल्या धनंजय मुंडेंशी बोलणं झालं नसतानाच ते परत येत आहेत, असं ठामपणे सांगितलं - संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत - संजय राऊत
शिवसेना भवनावर कुणाचे चित्र कुठे असावे हे ठरवणारे ते कोण? - राऊतांचा उदयनराजे भोसलेंवर प्रतिहल्ला
शरद पवार जाणते राजे आहेतच - संजय राऊत
राजकारणात धर्म आणू नका, हे बाळासाहेबांनीच सांगितलंय
नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते
महात्मा गांधी देशातील सर्वात मोठी हिंदुत्ववादी...
दिल्लीतलं वातावरण फार आशादायक आहे, असं वाटत नाही - संजय राऊत