शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती - राऊत
शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister`s post) संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले.
नाशिक : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister's post) संधी मिळायला हवी होती. पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आले, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नाशिकमध्ये (Nashik) बोलताना केले. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करते आहे, असा टोला त्यांनी लगावला. तर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचे महापौर निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी लेख लिहिला. त्यात काँग्रेसने अन्याय केल्याचा उल्लेख होता. हाच धागा पकडून संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांना आपेल स्पष्ट मत व्यक्त केले.
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी भाष्य केले. पवार यांच्यावर काँग्रेसने अन्याय केलाय, हे मी वारंवार म्हणत आलोय. शरद पवार हे देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. आज त्यांचे वय ८० झाले. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर फक्त शरद पवार आहेत, असे ते म्हणाले.
शरद पवार यांचे कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवार यांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तरेकडील नेत्यांनी शरद पवार यांना कायम अडथळ्यात टाकण्याचे काम केले. एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आले, असे राऊत म्हणाले.